कोरोनामुळं पर्यटन, जंगल सफारीला मोठा फटका; अनलॉकमुळं आता पुन्हा पर्यटन क्षेत्राला सोनेरी दिवस?

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळं पर्यटन व्यवसायाची 'न भूतो, न भविष्य' अशी हानी झाली. साहजिकच या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या मोठ्या वर्गाला याचा आर्थिक फटका बसला आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटन व्यवसायाचा हिस्सा ९.२ टक्के, तर जगाच्या जीडीपीत दहा टक्के इतका आहे. भारतात सुमारे २.६७ कोटी जणांना पर्यटनातून रोजगार मिळतो. २०१८ या वर्षात पर्यटन व्यवसायातून भारताला २८.६ अब्ज डॉलरची कमाई झाली होती. परंतू कोरोनाने हाहाकार माजवल्यामुळं मागील दिड वर्षापासून पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता. यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बरोजगाराची कुऱ्हाड कोसळली होती, त्यामुळं त्यांना उपासमारीला सामोरी जावे लागले होते. पण आता शासनाने ‘पुनश्चय हरि ओम म्हणत’ अनेक क्षेत्राना खुले करण्याची परवानगी दिली आहे. पर्यटन क्षेत्र १ ऑक्टोबरपासून खुलं करण्यात आले आहे. त्यामुळं आपण ‘पर्यटन आणि जंगल सफारी’मध्ये सुद्धा ‘सीमोल्लंघन’ करत आहोत.

  देशात २०२० मार्च महिन्यात कोरोना संक्रमण सुरू झाल्याने लॉकडाऊन करण्यात आला. विविध क्षेत्राबरोबर पर्यटन तसेच जंगल सफारी सुद्धा बंद करण्यात आली होते. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळं पर्यटन व्यवसायाची ‘न भूतो, न भविष्य’ अशी हानी झाली. साहजिकच या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या मोठ्या वर्गाला याचा आर्थिक फटका बसला आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटन व्यवसायाचा हिस्सा ९.२ टक्के, तर जगाच्या जीडीपीत दहा टक्के इतका आहे. भारतात सुमारे २.६७ कोटी जणांना पर्यटनातून रोजगार मिळतो. २०१८ या वर्षात पर्यटन व्यवसायातून भारताला २८.६ अब्ज डॉलरची कमाई झाली होती. परंतू कोरोनाने हाहाकार माजवल्यामुळं मागील दिड वर्षापासून पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता. यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बरोजगाराची कुऱ्हाड कोसळली होती, त्यामुळं त्यांना उपासमारीला सामोरी जावे लागले होते. पण आता शासनाने ‘पुनश्चय हरि ओम म्हणत’ अनेक क्षेत्राना खुले करण्याची परवानगी दिली आहे. पर्यटन क्षेत्र १ ऑक्टोबरपासून खुलं करण्यात आले आहे. त्यामुळं आपण ‘पर्यटन आणि जंगल सफारी’मध्ये सुद्धा ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. आता हळूहळू सकारात्मक बदल होतोय, आरोग्याची काळजी घेत कोरोनाच्या महामारीवर आपण ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. त्यामुळं पर्यंटन या क्षेत्राला पुन्हा सोनेरी दिवस येतील. मागील दिड वर्षात पर्यंटन व्यवसायाला कोणत्या प्रश्नांना सामोरी जावे लागले, बंद पडलेल्या या व्यवसायाचे कसे आर्थिक नुकसान झाले, इत्यादीचा आपण आढावा घेणार आहोत.

  कोरोनापूर्वी पर्यटन आणि जंगल सफारी 

  देशात कोरोना येण्यापूर्वी पर्यंटन आणि जंगल सफारीला अच्छे दिन होते. या क्षेत्रातून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावलेला आहे. १ फेब्रुवारी ते १० मार्च २०१९ दरम्यान अजिंठा लेणीला ४ हजार २१८ विदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. मार्च २०२० म्हणजे लॉकडाऊनच्या आधी याच कालावधीत ही संख्या फक्त ३ हजार २०२ इतकी होती. म्हणजे देशातील किंवा राज्यातील अशी अनेक पर्यटन स्थळांची उदाहरणे देता येतील. थोडक्यात काय तर, कोरोनाआधी पर्यटन आणि जंगल सफारी हि क्षेत्रं सुसाट धावत होती. त्यानंतर २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आणि पर्यंटन आणि जंगल सफारीला लगाम लागला. CIIच्या अहवालानुसार पर्यटन व्यवसायानं ऑक्टोबर २०१९ पासून मार्च २०२० पर्यंत २८ अब्ज डॉलरचा महसूल उत्पन्न करणं अपेक्षित होतं. पण कोरोनामुळे या महसूलात मोठ्या प्रमाणावर घट झाली.

  भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटन व्यवसायाचा हिस्सा ९.२ टक्के, तर जगाच्या जीडीपीत दहा टक्के इतका आहे. भारतात सुमारे २.६७ कोटी जणांना पर्यटनातून रोजगार मिळतो. २०१८ या वर्षात पर्यटन व्यवसायातून भारताला २८.६ अब्ज डॉलरची कमाई झाली आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली असल्यामुळे आणि सोयीसुविधांची उपलब्धता वाढत गेल्यामुळे, या क्षेत्राची उलाढाल २०२५ पर्यंत २०१८ सालाच्या जवळपास दीडपट होईल, असे भाकीत फेब्रुवारी २०२० पर्यंत वर्तविले जात होते. पण अचानक कोरोनाचे संकट आले आणि तसे पाहता त्याचा पहिला बळी गेला पर्यटनाचा. परिणामी या क्षेत्राला खिळ बसली. राज्यातील विविध म्हणजे ताडोबा, अभयारण्य, वर्धाताली बोर अभयारण्य, कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य इत्यादी अभयारण्यात जंगल सफारीचा पर्यटक आनंद घेत होते. पण कोरोनाच्या महामारीमुळं या सगळ्या आनंदावर विरझण पडले.

  कोरोनाकाळातील पर्यटन व्यवसाय

  जगात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदा कोणत्या क्षेत्रावर परिणाम झाला असेल तर, तो म्हणजे पर्यंटन क्षेत्रावर. कारण या विषाणूचा संसर्ग एका देशातून दुसऱ्या देशात होऊ नये, यासाठी देशादेशांनी आपल्या सीमा बंदिस्त करण्यास सुरुवात केली होती, विमान वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी, आधी विदेशातील आणि नंतर देशांतर्गत सहली रद्द झाल्या. लाखोंनी केलेले बुकिंग रद्द झाले. हॉटेल इंडस्ट्री संकटात सापडली. विविध पर्यटनस्थळी पर्यटकांवर अवलंबून असणारे टॅक्सी व्यावसायिक, अन्य सेवा देणारे व्यावसायिक, छोटे-मोठे विक्रेते या सर्वांची रोजीरोटी बंद झाली. पण यामुळे पर्यटन व्यवसायातील ही रोजगार साखळी नक्कीच विस्कळित झाली. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर विसंबून असलेली अनेक ठिकाणे परदेशात आहेत. सीआयआयच्या पर्यटन समितीच्या मते, पर्यटन व्यवसाय आणि त्याच्याशी संबंधित पूरक सेवांचा विचार करता, एकूण सुमारे पन्नास कोटी डॉलर्सहून अधिक नुकसान झाले आहे. भारतात देशविदेशांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही गेल्या काही वर्षांत वाढत गेली आहे. त्यातून सरकारला मोठ्या प्रमाणावर विदेशी चलनही मिळत असते. करोना संकटाचा विचार करता देशाला सुमारे एक अब्ज डॉलर्सच्या परकीय चलनाला मुकावे लागल्यची शक्यता आहे.

  “ट्रॅव्हल इंडस्ट्री मुळातच प्रवासाशी संबंधित आहे, मागील दिड वर्षात कोरोनामुळे पर्यंटन व्यवसाय बंद होता. “टूर मॅनेजरचं काम हे पर्यटकांसोबत फिरणं हे आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ असा पर्याय नसतो. त्यामुळे मागील दिड वर्षापासून आम्ही ‘जॉबलेस’ असल्यासारखेच आहोत, असं पर्यटन कंपनीमध्ये टूर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्यांनी म्हटलेय.” लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सोडा, अगदी जिल्ह्या-जिल्ह्याच्या सीमाही बंद आहेत. अशावेळी पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे सर्व संपून लोक पुन्हा प्रवासाला कधी करणार याबद्दलच्या अनिश्चिततेनंही या ट्रॅव्हल इंडस्ट्रीला ग्रासलं होत किंवा अजूनही आहे.

  “कोरोनाचा सगळ्यात पहिला फटका हा पर्यटन व्यवसायाला बसला. कोरोनाचा प्रसार जगभर ज्यापद्धतीनं झाला आहे, ते पाहता लोकांच्या मनात प्रवासाची भीती बसली आहे. त्यामुळे सगळं रुळावर आलं तरी लोक लगेचच फिरायला बाहेर पडणार नाहीत, हे वास्तव आहे. पुढचं किमान वर्षभर लोक बाहेर पडतील की नाही याबद्दल शंका आहे. असं ट्रॅव्हल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गांने म्हटलेय” मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर एप्रिलपर्यंत पर्यटनाचा सीझन असतो, पण हा सीझनमध्येच वाया गेला होता. आता तरी किती परदेशी पर्यटक येतील, हे सांगता येत नाही. कारण पर्यटकांच्या मनातील भीती गेली नाहिय. त्यामुळे फक्त औरंगाबादच्या पर्यटन व्यवसायाचा विचार केला, तर जवळपास २०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पर्यटन ही एक साखळी आहे. यामध्ये ट्रान्सपोर्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्स, गाईड, छोटे दुकानदार असे अनेकजण असतात. या सगळ्यांच्याच रोजगारावर मागील दिड वर्षापासून खिळ बसली आहे. तर अनेकांना उपासमारीला सामोरी जावे लागले होते.

  वनपर्यटन बंदमुळं वनविभागाचेही नुकसान

  पर्यटक परदेशी प्रवासाचं बुकिंग जवळपास सहा महिने ते वर्षभर आधी करतात. या प्रवासाची पॅकेजेसही महागडी असतात. पण लॉकडाऊनमुळं लोकांना रिफंडच हवा होता. पण ट्रॅव्हल कंपन्यांचेही पैसे विमान कंपन्या, हॉटेल्सकडे अडकलेले होते, अशावेळी पर्यटकांना केवळ ४० टक्के रक्कम परत देण्यात आली होती. मार्च २०२० मध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचीही परिस्थिती वरीलप्रमाणे होती. बुकिंग रद्द झाल्यामुळे ताडोबालाही आर्थिक फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे राज्यातील संरक्षित वनं, अभयारण्य, जंगल सफारी आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. “वर्षांला एकट्या ताडोबातून प्रवेश फी आणि इतर शुल्क याचा हिशोब करता दहा ते बारा कोटी रुपये उत्पन्न होतं. मागील वर्ष दिड वर्ष ताडोबा बंद असल्याने वनविभागाचं सहा ते सात कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचा अंदाज ताडोबाचे क्षेत्र अधिकारी एन. आर. प्रवीण यांनी वर्तविला आहे.” “वर्षाला ताडोबा व्याघ्र प्रकल्पात देशविदेशातून दोन लाख पर्यटक येतात. साधारण महिन्याला १५ हजार पर्यटक. या पर्यटनावर ताडोबाच्या आसपासच्या गावातील हजारो लोकांचे उत्पन्न अवलंबून आहे. यांतील जिप्सिचालक, गाईड, हॉटेल आणि रिसार्टमध्ये काम करणारे यांचा समावेश आहे,” असं प्रवीण यांनी म्हटलेय. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली कोकणची किनारपट्टी मागील दिड वर्षात ओस पडली होती. कोरोनाकाळात धार्मिक स्थळं बंद असल्यानं कोल्हापूर, पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर, नाशिक यासारख्या तीर्थक्षेत्रावर आधारलेली अर्थव्यवस्थादेखील संकटात आली आहे. व त्यावर अवलंबून असणा-यांचे सुद्धा प्रंचड हाल झाले आहेत.

  कोरोनानंतरचे पर्यटन आणि जंगल सफारी

  राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे आता सरकारकडून विविध गोष्टींवरील निर्बंध उठवले गेले आहेत. यामध्ये अभयारण्यात पर्यटकांसाठी लादलेली बंदीही उठवण्यात आली आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून राज्यातील पर्यटन आणि जंगल सफारी पुन्हा सुरु झाली आहे. यासाठी ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली आहे. मात्र, आता अभयारण्यांचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पूर्णपणे खुले झालेत. पेंच, बोर अभयारण्य, उमरेड-पवनी- कऱ्हाडला याठिकाणी सर्वप्रथम जंगल सफारींना सुरुवात झाली आहे. दरम्यान जंगल सफारीवेळी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील, असं शासनाने म्हटलेय.

  कोरोनाच्या तडाख्यातून हळूहळू का होईना, पण जगाची सुटका होऊ लागली आहे आणि जनजीवन पूर्वपदावर येतेय. याचाच फटका पर्यटन व्यवसायाला पुढील काही काळ सोसावा लागू शकतो, कारण कोरोनाच्या अर्थझळा सर्वांनाच बसल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण बचत, काटकसरीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळी पर्यटकांची संख्या रोडावण्याची दाट शक्यता आहे. अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देणाऱ्या पहिल्या पाच क्षेत्रांत पर्यटनाचा समावेश होतो, त्यामुळे या क्षेत्राचा विचार करणे, त्यासाठी आर्थिक पाठबळ देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात विदेशातील सहलींना येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता, देशांतर्गत पर्यटन स्थळांचा विकास शीघ्रतेने आणि नियोजनाने करण्याची नितांत गरज आहे. भारताला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. आपल्याकडे धार्मिक, आध्यात्मिक, प्राचीन वारसाही अत्यंत संपन्न आहे. तसेच पर्यटनासाठी सुरक्षित देशांमध्ये भारताची गणना होत असते. कोरोनाचा प्रसारही भारतात फारसा झालेला नाही, हे जगाने पाहिले आहे. या वैश्विक संकटाच्या काळात आपण अनेक अविकसित देशांना मोफत लस पुरवली, त्यामुळं स्वाभाविकपणे जगात भारताची प्रतिमा उदारमतवादी झाली आहे. भारताने अन्य देशांन ज्याप्रकारे मदत केली, त्यामुळे जागतिक स्तरावर भारताविषयीची आदरभावना वाढली आहे.

  या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी, देशातील पर्यटनस्थळांची स्थिती सुधारण्याची, तसेच पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज आहे. त्यातून केवळ विदेशी पर्यटकांचीच संख्या वाढेल असे नाही, तर देशांतर्गत पर्यटनही मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल. त्यातून अर्थव्यवस्थेलाही बहर येऊ शकेल; त्यामुळे सरकारने टुरिझम इंडस्ट्रीला संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पुढील काही महिने पर्यटन व्यवसायासाठी वाईट असणार, असं ‘कंफेडरेशन ऑफ इंडस्ट्री’ने (CII) कोरोना व्हायरसच्या परिणामांवर अभ्यास करताना म्हटलंय. CIIच्या पर्यटन समितीचे अध्यक्ष दीपक हकसर यांच्या मते, “पर्यटनयाविषयी आताच काही भाष्य करणं उचित ठरणार नाही. पण, भारतातील स्थिती पूर्वपदावर येणं हे विदेशात कशी परिस्थिती आहे, यावर अवलंबून असेल.”

  पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासंबंधी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजस्थानचे पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह भरतपूर यांच्याशी चर्चा केली होती. दरम्यान “महाराष्ट्रातील याआधीच्या कुठल्याही सरकारच्या तुलनेत यंदा सर्वाधिक निधी पर्यटन क्षेत्राला मिळालाय. त्यामुळं आम्ही पर्यटन क्षेत्राला खूप महत्त्व दिलंय. या क्षेत्रातून नवीन रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे, तसेच या क्षेत्राला चालाना देण्यासाठी उपाययोजना करणार, असं मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेय” आता जरी आपण कोरोनाच्या संकटावर मात करत ‘सीमोल्लंघन’ करत असलो तरी, आरोग्याची खबरदारी सुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळं मागील दिड वर्षापासून बंद असणारा पर्यटन व्यवसाय, आता सुरु झाल्यामुळं या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी घेण्यासाठी थोडा अवधी लागले मात्र, निश्चितच भविष्यात पर्यटनाला सोनेरी दिवस येतील. आणि पर्यटन व जंगल सफारीत पर्यटक स्वंच्छदी मुशाफिरी करतील यात शंका नाही.