कोरोनाकाळातील नाट्य रंगभूमीची पडझड, आणि आता दिड वर्षानंतर नाट्य रंगभूमीची वाजणार घंटा!

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, मॉल्स काही निर्बंधांसह सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला होता. मात्र, सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय झाला नव्हता. मात्र, आता ५० टक्क्यांच्या मर्यादेसह रंगभूमी २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसा आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना पाठवला आहे. मागील दिड वर्षापासून नाट्य रंगभूमीची घंटा वाजली नव्हती. परंतू आता आपण मनोरंजन क्षेत्रात सुदधा ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. त्यामुळं या क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

    भारतासह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे मोठमोठे उद्योगधंदे, कंपन्या बंद पडल्या. विविध क्षेत्रं ठप्प पडली. कोट्यवधी कामगार देशोधडीला लागले. नाका कामगारही, मजूर, कामगार, रोजंदारीवर काम करणारे हे सर्व कोरोनाकाळात बेरोजगार झाल्याचे चित्र आपण पाहिले आहे. मार्च २०२० टाळेबंदीपासून देशासह राज्यात नाट्य रंगभूमी सुद्धा स्तब्ध झाली होती. त्याचा मोठा आर्थिक फटका मराठी नाट्यसृष्टीलाही बसला आहे. त्यातच मुंबई महापालिकेने रंगभूमी करवाढीचा प्रस्ताव आणला होता. परंतु आता आपण कोरोनाच्या संकटावर ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. हळूहळू सकारात्मक बदल होतोय. आणि परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. देशासह मराठी नाट्य रंगभूमीची घंटा वाजणार असल्यामुळं रंगकर्मी, निर्माते, नाट्यसंस्था, नाट्यरसिक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

    राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, मॉल्स काही निर्बंधांसह सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला होता. मात्र, सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय झाला नव्हता. मात्र, आता ५० टक्क्यांच्या मर्यादेसह रंगभूमी २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसा आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना पाठवला आहे. मागील दिड वर्षापासून नाट्य रंगभूमीची घंटा वाजली नव्हती. परंतू आता आपण मनोरंजन क्षेत्रात सुदधा ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. त्यामुळं या क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील दिड वर्षात नाट्य रंगभूमीला काय पाहवे लागले? इथ काम करणाऱ्या लोकांचे कसे गेले दिवस? काय घडामोंडी घडल्या? यावर आपण नजर टाकणार आहोत.

    कोरोनापूर्वींची नाट्य रंगभूमी

    मागील दिड वर्षापासून कोरोनामुळं एका जागेवर स्तब्ध असणाऱ्या नाट्य रंगभूमीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सर्वाधिक फटका हा मनोरंजन सृष्टीतील व्यावसायिक नाटकांना बसला होता. मराठी नाट्य रंगभूमीला मोठी परंपरा आणि गौरवशाली इतिहास आहे. कोरोनाआधी मराठी नाट्य रंगभूमीवर सुरळीत आणि व्यवस्थित नाटकांचे प्रयोग होत होते. मराठी नाट्य रंगभूमीही नवोदित कलाकारांसाठी दैवत मानले गेले आहे. मराठी नाट्य रंगभूमीने अनेक दर्जेदार कलावंत घडवले आहेत. मराठी नाट्य रंगभूमीने अनेक कलाकार असे घडविले आहेत, जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताहेत.

    मराठी नाट्य रंगभूमीवर अनेक कुटूंबाचा संसाराचा गाडा चालत असे. कोरोनाआधी मराठी नाट्य रंगभूमीवर कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज, निर्माते, थिएटर मालक यांचे आर्थिक गणित अवलंबून असे. यावर या कुटूंबाचा उदरनिर्वाह, अर्थचक्र चालत असे. पण कोरोनाच्या महामारीमुळं आणि कोरोनाच्या थैमानामुळं मागील दिड वर्षात मराठी नाट्य रंगभूमीची घंटा वाजलीच नाही, परिणामी या क्षेत्रात काम करणाऱ्यांची मोठी ससेहोलपट झाली आणि त्यांना उपसामारीला सामोरी जावे लागले. तसेच कोरोनाच्याआधी नवीन अनेक नाटकं मराठी नाट्य रंगभूमीवर येणार होती. परंतु कोरोनाने देशात शिरकाव केला, आणि मार्च २०२० मध्ये देशात टाळेबंदीची घोषणा झाली, तेव्हापासून रंगभूमीवर नवीन नाटकं आली नाहीत. जी आगामी नाटके येणार होती, लाखाची गोष्ट, भान, खरं खरं सांग, गुड बाय डार्लिंग, संगीत शोले, सेकंड , इनिंग, ऑक्टोपस आणि माझ्या देवाक् काळजी रे इत्यादी नाटके येणार होती, परंतू कोविडमुळं ती येऊ शकली नव्हती.

    कोविडकाळातील नाट्य रंगभूमी

    देशात कोरोना आल्यापासून गेल्या दिड वर्षापासून रंगभूमीने कोट्यावधीचे नुकसान सोसले आहे. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. या काळात होणारे नाटकाचे असंख्य प्रयोग बंद ठेवावे लागले. यामुळे कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज कलाकार, निर्माते, थिएटर मालक यांचे प्रचंड नुकसान झाले. थिएटर मालक हतबल झाले होते. नाट्यव्यवसायांवर अवलंबून असणार्‍या कुटुंबांना रोजगारासाठी इतर मार्ग शोधावे लागले. कोरोनाच्या या महामारीत अनेक कुटुंबांना चांगलीच आर्थिक झळ सोसावी लागली. दरम्यान मध्यंतरी या क्षेत्रांशी काम करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत होते, म्हणून रंगभूमी पुन्हा सुरु व्हावी, यासाठी आंदोलन करण्यात आले होते.  मागील वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०२० मध्ये रंगभूमी सुरु करण्याचा शासनाने गांर्भिर्याने विचार करणे गरजेचे आहे. आता शासनाने रंगभूमीवरील निर्बंध उठवावेत व पुन्हा ते सोनेरी दिवस अनुभवायला द्यावेत अशी मागणी कलाकारांनी केली होती.

    “रंगभूमीवरील नाट्यप्रयोग सुरु व्हावेत अशी मागणी कलाकारांनी केली होती, पण कोरोनामुळे रसिकच नाटकाला नाही आले तर ते कुणालाच परवडणारे नाही. कोरोनामुळे गर्दी कमी करण्यासाठी सीटची मर्यादा येणार व अर्थकारण कमी पडणार हे परवडणारे नाही. पर्यायाने पुन्हा प्रयोग बंद करावे लागतील ही भीती आहे. शासनाने यावर योग्य तोडगा काढावा असे सुप्रसिद्ध अभिनेता वैभव मांगले यांनी म्हटले होते.” त्यावेळी याच पार्श्वभूमीवर मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेता भरत जाधव यांनी लॉकडाऊन न करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. “लॉकडाऊनमुळं आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू, असंही त्यांनी म्हटलं होतं. गेल्या वर्षभरात नाटक सुरू करण्यासाठी आम्ही सर्वस्व दिलं. नाट्यक्षेत्राला गती येत असताना पुन्हा नाटकं बंद झाली आहेत. त्यामुळं नाट्य रंगभूमीला मोठे आर्थिक नुकसाम सहन करावे लागत आहे.”

    चांगलं, व्यावसायिक नाटक म्हणजे तुफान गर्दी आणि गर्दी ही कोरोनासाठी घातक आहे. हॉटेल्समध्ये एक टेबल सोडून ग्राहक बसू शकतात, पार्सल घरी घेऊन जाऊ शकतात, होम डिलिव्हरी मागवू शकतात, पण नाटकांचं तसं नाही. नाटकांचं गणित वेगळं आहे. कोविडमधून लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर स्वच्छतेची मूलभूत गरज आहे, पण नाटकाच्या थिएटरमध्ये कायम स्वच्छतेचा अभाव असतो. स्वच्छतागृह, मेकअप रूम ही ठिकाणं नेहमी गलिच्छ असतात. असे प्रश्न कोणीही सोडवताना दिसत नाही. लोक नियम पाळताना दिसत नाहीत. सगळी जबाबदारी सरकारवर टापून चालणार नाही. सरकार म्हणजे कोण, आपणच ना? कोविड काळ आणि भविष्य ही दोन नाटय व्यवसायासाठी मोठी आव्हान आहेत. ती पेलायची असतील सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. असं सुदधा कोरोनाकाळात अनेक कलाकारांची भूमिका होती.

    नाट्य रंगभूमी सुरु व्हावी यासाठी आंदोलन

    नाटक बंद असल्यामुळं, प्रयोग होत नसल्यामुळं रंगभूमीवर काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज कलाकार, निर्माते, थिएटर मालक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. थिएटर मालक हतबल झालेत. नाट्यव्यवसायांवर अवलंबून असणार्‍या कुटुंबांना रोजगारासाठी इतर मार्ग शोधावे लागत आहेत. कोरोनाच्या या महामारीत अनेक कुटुंबांना चांगलीच आर्थिक झळ सोसावी लागली. छोटे- मोठे कलाकार, पड्द्यामागचे कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती, म्हणून सरकारने नाट्य रंगभूमी लवकर सुरु करावी, काही नियमावली आखून दिली तरी आम्ही त्याचे पालन करु, पण नाट्य रंगभूनी सुरु करा, यासाठी राज्यभऱात आंदोलन करण्यात आले होते.  गेले दीड वर्ष विविध क्षेत्रातील रंगकर्मींना हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे या रंगकर्मींमध्ये ठाकरे सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. आपल्याकडे सरकारने या अडचणीच्या काळात पाठ फिरवल्याचे दुःख रंगकर्मीना आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांवर आणि रंगभूमीवर काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काहींवर तर आत्महत्या करण्याचीही वेळ आली आहे. या क्षेत्रातील ८० टक्के कर्मचारी हे रोजंदारीवर जगतात. अशावेळी या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडे राज्य सरकारने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. रंगकर्मींच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे रंगकर्मींमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता, किंवा आहे.

    नाटक, सिनेमा मालिका यांच्याबरोबरच, भजन, किर्तन, भारुड, गोंधळ तसंच तमाशासारख्या लोककलांना हे कलाकार जिवंत ठेवत असतात. लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना हे सगळे कलाविष्कार बघता येत नाहीयेत. परंतु या कलाकारांवर मोठंच संकट कोसळलं आहे. प्रेक्षक नसल्याने कलाकारांचं उपजीविकेचं साधनच नष्ट झालं आहे. अनेक रंगकर्मी रोजंदारीवर काम करतात. त्यामुळे आज अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत कलाकारांनी काही मागण्या सरकारकडे ठेवल्या होत्या, दरम्यान राज्यभरातील तमाम रंगकर्मींनी या मागण्यांसाठी तसेच रंगभूमी पुन्हा सुरु व्हावी म्हणून आंदोलन सुद्धा केले होते.

    कोरोनानंतरची नाट्य रंगभूमी

    आता हळूहळू खुले होत आहे, आपण कोरोनाच्या संकटावर मात करत ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. आता सकारात्मक बदल झाल्यामुळं आपण एक-एक पाऊल पुढे टाकत आहोत. “नाट्य रंगभूमी सुरु झाल्यानंतर किंवा भविष्यकाळात आपण रंगभूमीविषयी पूर्ण आशावादी असल्याचे अनेक कलाकारांनी म्हटले आहे. “दर्जेदार नाटयनिर्मिती करणारे निर्माते, लेखक, दिग्दर्शक पुन्हा नव्याने उभे राहतील. अर्थात हे सगळ कोविडचा धोका नष्ट झाल्यानंतर. छोटया नाटयनिर्मात्यांसाठी भविष्यकाळ कठीण आहे. सर्वांना टिपून राहायचं असेल तर सामूहिक प्रयत्न होणं जरुरीच आहे. भविष्यात नाटकाच्या तिकिटांचे दर ठरवताना निर्मात्यांनी विचार करायला हवा. थिएटर मालकांनी थिएटर भाडेदरांचा पुनर्विचार करायला हवा. कलाकारांनी अवाच्या सवा नाईट आकारू नये, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी पातळीवरसुद्धा नाटय व्यवसायाला कशी संजीवनी मिळेल याचा सकारात्मक विचार व्हायला पाहिजे. निर्माता जगला तरच मराठी रंगभूमीचा पुनर्विकास शक्य आहे. सर्वांनी एकत्र येऊन एक मिशन म्हणून याकडे पाहण्याची नितांत गरज आहे. असं कलाकारांनी म्हटले आहे.”

    “भविष्यात जरी कोरोनाचे रुग्ण वाढले किंवा लॉकडाऊनचं संकट आले तर, नाटक सावरत नाही, त्याच्या होणाऱ्या भीषण परिणामांना तोंड द्यावं लागेल, आणि त्याचा थेट परिणाम आमच्या उपजीविकेवर होतो. त्यामुळे राज्य सरकारने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेऊ नये ही कळकळीची विनंती, असं अभिनेता भरत जाधव यांनी म्हटलं आहे.” जर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागला तर पुन्हा मागील वर्षीसारखा फटका सिनेसृष्टीला बसेल. असं असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागला तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद करण्यात येतील, अशी चिंता कलाकारांना सतावत आहे. तसेच नाट्य रंगभूमीची पुन्हा मोठे नुकसान होईल असं अनेक कलाकारांनी म्हटलेय.

    नाटकांसाठी सरकारकडून तिसरी घंटा वाजली आहे. मात्र, अजूनही राज्यात कोरोना विषाणूची भीती कायम असून, निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्यप्रयोग करा, कलाकार व प्रेक्षकांची काळजी घ्या. आता पुढील काळात अत्यंत खबरदारीने पाऊल टाकणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कोरोना नंतरच्या काळात निर्मात्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या विविध मागण्या येत आहेत. नाट्यगृहांच्या भाड्याच्या बाबतीत आपल्या मागणीवर शासन नक्की विचार करेल. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे आपण म्हणतो. पण आता पुढील काळात ते अत्यंत खबरदारीने टाकणे गरजेचे आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची आठवण सुद्धा करुन दिली. प्रत्येक निर्मात्याने कलाकारांचे चेकअप करावे, स्टेजवर कलाकारांनी अंतर ठेवावे, स्वच्छता ठेवावी. थिएटरमध्ये सुद्धा ‘नो मास्क नो एन्ट्री’ असे असले पाहिजे. नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॉल्स देखील नियम पाळतात की नाही हे पाहिले पाहिजे, असं सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

    दरम्यान आपण आरोग्याची काळजी घेत नाट्य रंगभूमीवर ‘सीमोल्लंघन’ करत आहोत, मात्र खबरदारी ही घेतलीच पाहिजे. मागील दिड वर्षात मराठी नाट्य रंगभूमीचे जे नुकसान झाले आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. नाट्य रंगभूमी २२ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे, त्यामुळं या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. आगामी काळात मराठी नाट्य रंगभूमीची दिमाखात तिसरी घंटा वाजेल. आणि पुन्हा मराठी नाट्य रंगभूमीला गतवैभव प्राप्त होईल, नाट्य रंगभूमीला सोनेरी दिवस येतील अशी आशा करुया.