
कोविडकाळात शेअर बाजारात कोरोनाचा कोणताच परिणम दिसून आला नव्हता. उलट कोरोनाकाळात शेअऱ बाजारात अधिक तेजी येत होती, शेअर बाजाराच निर्दशांक अधिक वाढत गेला होता. कोविडकाळात लोकांची नोकरी गेली, कित्येकांचे रोजगार गेले, अनेकांना कामावरुन काढून टाकण्यात आले, रोजंदारीवर काम करणारे कामगारांचे प्रचंड हाल झाले, लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली, परंतू शेअर बाजारात काम करणाऱ्यांनी घरातून ऑनलाईन कामधंदा चालू ठेवल्यामुळं या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे अर्थचक्र सुरु होते. कोविडकाळात काम नसल्यामुळं घरात बसून कित्येकांनी शेअर बाजारात ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. तर अनेक मराठी माणसांचा शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे कल वाढला. कोविडकाळत सर्वं क्षेत्रांना घरघर लागली असताना, शेअर बाजाराला ‘अच्छे दिन’ आले होते. कोरोनाकाळात शेअर बाजारातील उच्चांकी निर्देशांक पन्नास हजाराचा टप्पा बीएसईने गाठत, खरे ‘सीमोल्लंघन’ केले होते.
मार्च २०२० पासून जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाने एवढे थैमान घातले होते की, सर्व जग स्तब्ध झाले होते. या जागतिक महामारीमुळं सर्रास क्षेत्रात खळबळ माजली होती. कोरोनाच्या महामारीचा सर्वंच क्षेत्रावर दूरगामी परिणाम जाणवला आहे. कोरोनाकळात सर्वं उद्योग, आस्थापनं, कारखाने, कार्यालयं आदीवर परिणाम झाला. कोरोनाकाळात विविध क्षेत्र बंद असताना, देशात फक्त एकमेव अपवादात्मक क्षेत्र सुरु होते, आणि ते म्हणजे ‘शेअर बाजार’. कोरोनाकाळात लोकांची नोकरी गेली, कित्येकांचे रोजगार गेले, अनेकांना कामावरुन काढून टाकण्यात आले, लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली, परंतू शेअर बाजारात काम करणाऱ्यांनी घरातून ऑनलाईन कामधंदा चालू ठेवल्यामुळं या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे अर्थचक्र सुरु होते. कोविडकाळात काम नसल्यामुळं घरात बसून कित्येकांनी शेअर बाजारात ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. तर अनेक मराठी माणसांचा शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे कल वाढला. कोविडकाळत सर्वं क्षेत्रांना घरघर लागली असताना, शेअर बाजाराला ‘अच्छे दिन’ होते. कोरोनाकाळात शेअर बाजारातील उच्चांकी निर्देशांक पन्नास हजाराचा टप्पा बीएसईने गाठत, खरे ‘सीमोल्लंघन’ केले होते. आता तर साठ हजारच्या आसपास शेअर बाजाराने उच्चांक निर्देशांक गाठला आहे. त्यामुळं मागील दिड दोन वर्षात शेअर बाजारातील तेजी हि खरोखरच सकारात्मक बाब म्हणावी लागेल. आता आपण हळूहळू सर्व काही खुले करत असून, आरोग्याची काळजी घेत, कोरोनाच्या संकटावर मात करत ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. मागील दिड दोन वर्षात शेअऱ बाजारात काय बदल झाले? कोविडकाळात शेअर बाजाराकडे लोकांचा कल वाढला? आगाम काळात शेअर बाजाराची दिशा कसी असेल? या आणि अशा अनेक प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत.
कोविडआधी शेअर बाजारातील परिस्थिती
कोरोनाआधी शेअर बाजारात चढउतार दिसून येत होता. १३ मार्च २०२० म्हणजे टाळेबंदीच्या आधी मुंबई शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक पडझड झाल्यामुळे व्यवहार एक तासासाठी बंद करण्यात आला होता. शेअर बाजार उघडताच निर्देशांकात ३१०० अंकांनी घसरण होऊन तो ३० हजारांच्या खाली गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. निफ्टीमध्येही ९०० अंशांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स नियंत्रणाबाहेर पडल्यामुळे सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत ‘बीएसई’मधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. फेब्रुवारी २०२० या महिन्यात मुंबईसह आशियाई शेअर बाजारात कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळला होता. जपान, अमेरिकेतील शेअर बाजारही कोसळलेले होते. परिणामी मुंबई शेअर मार्केटही १० टक्क्यांनी कोसळला होता. त्यामुळे मुंबई शेअर मार्केटचे व्यवहार बंद करण्यात आले होते. दरम्यान यावेळी सोन्याच्या दरावरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्याचे दर २६०० रुपयांनी घटले होते, तर, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भावही १६ टक्क्यांनी घसरला होता.
दरम्यान शेअर बाजाराच्या इतिहासात याआधी दोन वेळा मार्केट बंद करण्याची वेळ आली होती, अशी माहिती शेअर मार्केट विषयातील तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळं “आगामी काळात शेअरचे भाव पुन्हा वधारतील, त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही, असं आवाहन शेअर मार्केट अभ्यासकांनी केलं होतं” सेबी (SEBI) म्हणजे Securities and Exchange Board of India किंवा भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने निर्देशांकाबाबत काही नियम ठरवले आहेत. ‘सेबी’च्या नियमानुसार निर्देशांक (सेन्सेक्स किंवा निफ्टी) एक वाजण्याआधी १० टक्क्यांनी घसरले, तर व्यवहार ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येतो. कोरोना व्हायरसमुळे आर्थिक विकासाला फटका बसण्याची भीती गुंतवणूकदारांनी व्यक्त केली होती, या नैराश्यामुळेच मुंबई शेअर बाजार कोसळला होता. त्यावेळी कोरोनाच्या भीतीमुळं आणि बाजारातील चढउतार यामुळं अनेकांनी गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान लॉकडाऊनच्या आधी सेन्सेक्स ३० हजाराच्या आसपास होता. तर निफ्टी ८ हजार.
कोविडकाळातील शेअर बाजार
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळं सर्रास क्षेत्रात खळबळ माजली होती. कोरोनाच्या महामारीचा सर्वंच क्षेत्रावर दूरगामी परिणाम जाणवला होता किंवा आहे. कोरोनाकळात सर्वं उद्योग, आस्थापनं, कारखाने, कार्यालयं आदीवर परिणाम झाला. कोरोनाकाळात विविध क्षेत्र बंद असताना, देशात फक्त एकमेव अपवादात्मक क्षेत्र सुरु होते, आणि ते म्हणजे ‘शेअर बाजार’. कोविडकाळात शेअर बाजारात कोरोनाचा कोणताच परिणम दिसून आला नव्हता. उलट कोरोनाकाळात शेअऱ बाजारात अधिक तेजी येत होती, शेअर बाजाराच निर्दशांक अधिक वाढत गेला होता. कोविडकाळात लोकांची नोकरी गेली, कित्येकांचे रोजगार गेले, अनेकांना कामावरुन काढून टाकण्यात आले, रोजंदारीवर काम करणारे कामगारांचे प्रचंड हाल झाले, लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली, परंतू शेअर बाजारात काम करणाऱ्यांनी घरातून ऑनलाईन कामधंदा चालू ठेवल्यामुळं या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे अर्थचक्र सुरु होते. कोविडकाळात काम नसल्यामुळं घरात बसून कित्येकांनी शेअर बाजारात ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. तर अनेक मराठी माणसांचा शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे कल वाढला. कोविडकाळत सर्वं क्षेत्रांना घरघर लागली असताना, शेअर बाजाराला ‘अच्छे दिन’ आले होते. कोरोनाकाळात शेअर बाजारातील उच्चांकी निर्देशांक पन्नास हजाराचा टप्पा बीएसईने गाठत, खरे ‘सीमोल्लंघन’ केले होते. आता तर साठ हजारच्या आसपास शेअर बाजाराने उच्चांकी निर्देशांक गाठला आहे.
मागील दिड दोन वर्षात शेअर बाजारातील तेजी हि खरोखरच सकारात्मक बाब म्हणावी लागेल. शेअर मार्केटने देशाच्या अर्थव्यवस्थेत सुदधा हातभार लावला आहे. एकिकडे सर्व क्षेत्रांचे अर्थचक्र थांबले असताना, घरी बसून लोकांनी गुंतवणूक केल्यामुळं शेअर बाजारात अधिक तेजी, बाजारातील निर्देशांक अधिक वाढत गेला. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी प्राप्तिकरात कोणताही विशेष बदल न करणे, तसेच पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ, या निराशेची बाजू असल्या, तरी कोरोना तसेच लॉकडाउन हा काळ युद्धजन्य परिस्थितीसारखाच होता. देशाची वित्तीय तूट आणि एकूण देशांतर्गत उत्पादनाचे (जीडीपी) प्रस्थापित ग्राह्य मापदंड बाजूला ठेवत देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी अर्थसंकल्पात खर्चाचे प्रमाण वाढवून धाडसी पाऊल टाकले गेले होते. हा अर्थसंकल्प कोरोनानंतरचा असल्यानं विशेष होता. बजेटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार उघडताच मोठी उसळी पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात तेजीचं वातावरण पाहयला मिळाले. बजेट सादर होण्याआधीच शेअर बजारात सेन्सेक्स वधारला होता. फेब्रुवारीत अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत करत ‘सेन्सेक्स’ने ५०,७३१ अंशावर, तर ‘निफ्टी’ने १४,९२४ अंशावर होता. कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल अडखळत सुरु होती. भांडवली बाजारातील अस्थिरतेमुळे मध्यंतरीच्या काळात परदेशी गुंतवणुकदार जपून गुंतवणूक करताना दिसले होते. मात्र, त्यानंतही शेअऱ बाजारातील घोडदौड सुरुच राहिली होती. त्यामुळे परकीय गुंतवणुकदार पुन्हा भारताकडे वळले आहेत. दरम्यान परकीय गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारात केंद्रीय अर्थसंकल्पीय महिन्यात १३,२७० कोटींची गुंतवणूक केली होत. हा ट्रेंड आगामी काळात कायम राहण्याची शक्यता शेअर मार्केटमधल तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.
कोरोनाकाळात शेअर बाजाराकडे लोकांचा कल वाढला
देशात २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळं सर्व काही बंद करण्यात आले होते. अपवाद फक्त शेअर बाजाराचा वगळता. सुरुवातील २१ दिवसांचा लावलेला लॉकडाऊन पुन्हा १४ दिवसांचा वाढविण्यात आला. त्यामुळं शहरात घरी बसण्यापेक्षा कित्येकांना आपल्या गावी जाण पसंद केले. या काळात कामधंदा बंद असल्यामुळं घरी बसून करायचे काय? म्हणून अनेकांनी शेअर मार्केट शिकून घेतले. शेअर मार्केटचे ऑनलाईन क्लासेस लावत, शेअर मार्केटबद्लची प्रशिक्षण, माहिती घेतली. सर्व क्षेत्र बंद असल्यामुळं, आणि उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्यामुळं तसेच पैसे कमविण्यासाठी हाताला काम नसल्यामुळं पर्याय म्हणून पैसे कमविण्यासाठी लोकांनी आपला मोर्चा शेअर मार्केटकडे वळविला होता किंवा अजूनही आहे. लोकांनी छोटी छोटी गुंतवणूक केल्यामुळं शेअर बाजारा वधारल्याचे चित्र होते. कोविडकाळात मराठी माणूस देखील शेअर मार्केटकडे वळल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेअर मार्केटचे ऑनलाईन क्लासेस घेण्याऱ्यांची सुद्धा संख्या वाढली आहे. वर्क फॉर्म होम करत अनेकांनी चांगले पैसे शेअर बाजारातून कमावल्याचे समोर आले आहे.
आगामी काळातील शेअर मार्केट
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बरेच काही बदलत आहे. हळूहळ सकारात्मक बदल होत, आपण सर्व क्षेत्रात ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. आता अनलॉक झाल्यानंतर किंवा दिवाळीनंतर शेअर मार्केटमध्ये अधिकाधिक गुंतवणूकदार गुंतवणूक करतील असं शेअर मार्केटमधील तज्ज्ञांनी म्हटले आहे. मालमत्तेपेक्षाही शेअर्स तसंच म्युच्युअल फडांना अधिक पसंती मिळणार आहे. येत्या काळात देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातही वाढ संभवते. रिटेल क्षेत्रावरही कोरोनाचा परिणाम झाला आहे. दुसरं म्हणजे हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे रुपडेच बदलणार आहे. एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था जवळपास ४५ टक्क्यांनी घसरली होती. २०२१-२२ चं सकल राष्ट्रीय उत्पन्न २०१९-२० पेक्षा कमी असेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात घट झाल्यामुळे अर्थातच उत्पन्न कमी होईल. रोजगार, नोकर्यांवर परिणाम होईल. सोन्यातील गुंतवणूकही काही प्रमाणात कमी होत आहे, तर दुसरीकडे म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक वेगाने वाढते आहे. ती गेल्या दोन वर्षांत इतकी वाढली आहे की, या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणार्या कंपन्या चांगला नफा कमवत आहेत.
आगामी काळत किंवा दिवाळीनंतर शेअर बाजारात आणखी तेजी येईल असं तज्ज्ञांनी म्हटले आहे. “आगामी काळात दिवाळीपर्यंत शेअर बाजाराची दिशा ही थोडी वरच्या दिशेनेच राहील, पण अगोदरच शेअर बाजार इतक्या वरती आलाय की, थोडा फार बदल देखील बाजारामध्ये केव्हाही येऊ शकतो. गुंतवणूकदारांना त्यासाठी तयार राहावे लागेल. गेल्या दीड वर्षात शेअर बाजाराने अमाप परतावा दिलेला आहे. अर्थात ज्याने शेअर बाजारात थोडासा डेअरिंग करून थेट गुंतवणूक अथवा ट्रेडिंग केले अशानाच. बाकी इतर सर्व गुंतवणूक क्षेत्रांमध्ये परतावा हा फार अल्प प्रमाणात होता. अगदी म्युच्युअल फंडाने सुद्धा म्हणावा तसा परतावा गेल्या दीड वर्षात दिलेला नाही. काही अपवाद सोडले तर बाकी सर्वांनी निराशाच केली आहे. मागील मार्चपासून आत्तापर्यंत निर्देशांक दामदुपटीने वाढला. पण म्युच्युअल फंड NAV काही त्या प्रमाणात वाढलेली दिसली नाही. दिवाळीनंतर साधारण बाजार कन्सोलिडेशनमध्ये जायची शक्यता आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील २ आठवडे हा नेहमीच परदेशीय वित्तीय गुंतवणूकदारांसाठी सुट्टीचा कालावधी असतो. त्यामुळे यादरम्यान बाजार आणखीन उसळी घेईल असे वाटत नाही, पण तरी गुंतवणूकदारांनी ठराविक अंतराने आपला नफा देखील खिशात घालावा आणि पुन्हा बाजारखाली आला तर चांगले-चांगले समभाग निवडून त्यात गुंतवणूक करावी. बाकी कुठे ‘अच्छे दिन’ होते का माहिती नाही. पण शेअर बाजाराने मात्र गेल्या दिड-दोन वर्षात अच्छे दिन म्हणजे काय हे दाखवून दिले आहे, असं शेअर बाजार अभ्यासक निखिलेश सोमण यांनी म्हटले आहे.” थोडक्यात काय तर एकिकडे कोरोनामुळं सर्वं क्षेत्रातील अर्थचक्र थांबले असताना, शेअर बाजारातील तेजी अधिकाधिक उजळत गेली, आणि त्या तेजीने (पैसाने) मात्र लोकांच्या चेहऱ्यांवर प्रसन्नता दिसली आणि ती भविष्यात सुद्धा दिसेल अशी अपेक्षा करुया.