प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबईत शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आल्यानंतर आता सिंधुदुर्गातही दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लीटर पेट्रोल प्रति वाहन देण्यात येणार होते. या आंदोलनात सर्वसामान्यांप्रमाणेच भाजप सदस्यत्वांचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांनाही पेट्रोल मोफत देण्यात येणार होते. ज्या पेट्रोलपंपावर शिवसेनेने आंदोलन आयोजित केले तो पेट्रोलपंप भाजप खासदार नारायण राणे यांचा आहे. पेट्रोलपंपावरून मोफत पेट्रोल वाटपाचे आंदोलन पुकारून खिचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

    सिंधुदुर्ग : मुंबईत शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आल्यानंतर आता सिंधुदुर्गातही दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लीटर पेट्रोल प्रति वाहन देण्यात येणार होते. या आंदोलनात सर्वसामान्यांप्रमाणेच भाजप सदस्यत्वांचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांनाही पेट्रोल मोफत देण्यात येणार होते. ज्या पेट्रोलपंपावर शिवसेनेने आंदोलन आयोजित केले तो पेट्रोलपंप भाजप खासदार नारायण राणे यांचा आहे. पेट्रोलपंपावरून मोफत पेट्रोल वाटपाचे आंदोलन पुकारून खिचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

    मैदानात उतरल्यास पळण्याची संधी मिळणार नाही

    राणे स्टाईलने शिवसेनेला थाळी मिळेल. राणे मैदानात उतरतात तेव्हा पळणाऱ्यांना पळून जाण्याची संधी मिळत नाहीत. ज्यांनी महिलांवर हात उचलला त्यांची नावे आमच्याकडे आली आहेत. त्यांना पाहून घेऊ असा इशारा भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे. तुम्ही दिलेली व्हेज थाळी होती आता नॉनव्हेज थाळी कशी द्यायची आम्हाला माहिती आहे. स्वत:ला सांभाळले नाही तर तुमच्या वाटेलाही शिवथाळी येईल हे समजणार नाही असे राणेंनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे. दरम्यान शिवसेना व भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दंगल नियंत्रण पथकही सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहे.

    आजची शिवसेना ही बाळासाहेबांची नाही तर उद्धव-आदित्यची आहे. हिंदुत्व गुंडाळून ठेवणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये. शिवसेना भवनाचा इतिहास राऊतांना माहिती नाही. माझ्यासारख्या शिवसैनिकांनी स्वत: वर्गणी दिली. तेव्हा शिवसेना भवन उभे राहिले. कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या आपल्या पक्षाच्या आमदारावर गुन्हे दाखल करायची हिंमत दाखवावी.

    - नारायण राणे, खासदार, भाजपा