May God save Konkan from such fools Nitesh Rane criticizes Vinayak Raut

कणकवली मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढत आहे. महाविकास आघाडीमध्ये कणकवली मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार? याची उत्सुकता आहे. यामुळे २०२४ ची विधानसभा निवडणुक नितेश राणेंसाठी धोक्‍याची घंटा असणार असा इशारा शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात थेट सामना रंगला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे. नितेश राणे यांच्या पुढाकाराने २८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. असे असले तरी कणकवली मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढत आहे. यावरुनच शिवसेनेने नितेश राणेंवर निशाणा साधला आहे.

कणकवली मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढत आहे. महाविकास आघाडीमध्ये कणकवली मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार? याची उत्सुकता आहे. यामुळे २०२४ ची विधानसभा निवडणुक नितेश राणेंसाठी धोक्‍याची घंटा असणार असा इशारा शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे.

भाजपचा विरोधक काँग्रेस असून मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढत असल्याचे भाजप आमदार राणे म्हणतात. याचा अर्थ महाविकास आघाडीची ताकद राणे मान्य करतात. यामुळे आगामी निवडणुकीत राणे भाजपमध्येच राहणार, की पक्ष बदलणार? असा सवालही सतीश सावंत यांनी उपस्थित केला आहे.

निवडणुकीपुर्वीच शिवसेनेच्या १० जागा बिनविरोध झाल्या असून सुमारे १७ ग्रामपंचायतीवर शिवसेना सत्ता स्थापन करेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.