According to Amit Shah, the Mumbai Municipal Corporation had left power last time; BJP leader's assassination

नारायण राणे... शिवसेनेचा नंबर एकचा शत्रू... नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यातून अर्थात सिंधुदूर्गतुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जाहीर सभेत शिवसेनेला डिवचले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शहांनी गंभीर आरोप केलेत.

    सिंधुदूर्ग : नारायण राणे… शिवसेनेचा नंबर एकचा शत्रू… नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यातून अर्थात सिंधुदूर्गतुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जाहीर सभेत शिवसेनेला डिवचले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शहांनी गंभीर आरोप केलेत.

    शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिलेने नव्हते. उद्धव ठाकरे ढळढळीत खोटं बोलत असल्याचाचही दावा शाह यांनी केलाय. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो, असंही त्यांनी नमूद केलं.

    जनादेश नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन करण्याचा होता असेही ते म्हणाले. ते म्हणतात आम्ही वचन तोडलं. आम्ही वचन पाळणारे लोक आहोत. एक अपवित्र आघाडी करुन सत्तेच्या लालसेपोटी येथे सरकार स्थापन झालं असा घणाघात करत शहांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला.

    मोदींचा फोटो वापरुन निवडणूक लढली. माझ्यासोबत आणि मोदींसोबत तुमची रॅली झाली. प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हटलं की एनडीएचं सरकार बनवा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्यावेळी उद्धव ठाकरे का बोलले नाही? असं कोणतंच बोलणं झालं नव्हतं. सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व मुल्यांना तापी नदीत विसर्जित करुन ते सत्तेवर बसलेत असा घणाघातही शाह यांनी केला.