amit shah in hyderabad

‘‘मी कधीच बंद दाराच्या आड काम करत नाही. जे काही करायचं ते छातीठोकपणे जाहीर राजकारण करतो, ते म्हणतात बंदखोलीमध्ये वचन(promise) दिले होते. मी उद्धव ठाकरे यांना कोणतेही आश्वासन दिले(no promise to uddhav thakre) नव्हते’’, अशा शब्दांत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

    सिंधुदुर्ग : ‘‘मी कधीच बंद दाराच्या आड काम करत नाही. जे काही करायचं ते छातीठोकपणे जाहीर राजकारण करतो, ते म्हणतात बंदखोलीमध्ये वचन(promise) दिले होते. मी उद्धव ठाकरे यांना कोणतेही आश्वासन दिले(no promise to uddhav thakre) नव्हते’’, अशा शब्दांत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

    सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या लाईफटाइम मेडिकल कॉलेजचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला.त्यावेळी ते यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तसंच काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग सुद्धा कार्यक्रमाला हजर होते.

    यावेळी अमित शहा म्हणाले की,“राज्यात आलेले महाविकास आघाडीचे सरकार हे ऑटो रिक्षावालं सरकार आहे. त्याची तिन्ही चाकं तिन्ही दिशेला आहे. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. सत्तेच्या लोभापायी जनादेशाविरोधात सरकार तयार केले आहे. हे सरकार विफल ठरलं आहे. जनतेन दिलेल्या पवित्र जनादेश ठोकरून हे सरकार बनले आहे.’’

    ते पुढे म्हणाले की, बिहारमध्ये आम्ही वचन दिले आणि जास्त जागा असूनही नितीश कुमार यांना सांगितल्यानुसार मुख्यमंत्रिपद दिलं. आणि हे म्हणतात बंदखोलीमध्ये वचन दिले होते. मी कधीच बंददाराआड काम करत नाही. जे काही करायचे जे उघडपणे करतो. मी छातीठोकपणे जाहीर राजकारण करतो, मी बंददाराआड  उद्धव ठाकरेंना कोणतंही वचन दिलं नव्हतं.