सेना भवनानंतर पुन्हा सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, या पोस्टरमुळं उडाला भडका, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला

शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एक योजना जाहीर करून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. या दिवशी पेट्रोल पंपावर प्रत्येक नागरिकाला १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल मिळेल, असा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. त्याशिवाय भाजपचे सदस्य असल्याचं कार्ड दाखवल्यास १ लिटर पेट्रोल मोफत मिळेल, अशीही घोषणा त्यांनी केली होती. विशेष म्हणजे ज्या पेट्रोल पंपावर हा कार्यक्रम घेण्यात आला, तो नारायण राणेंच्या मालकीचा होता. 

    मुंबईतील शिवसेनाभवनसमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जसा राडा आणि हाणामारी झाली, तसाच काहीसा प्रकार कोकणातही घडलाय. सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि तुंबळ हाणामारी झाली. निमित्त होतं शिवसेनेचे आमदार वैभव नाईक पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या अनोख्या कार्यक्रमाचं.

    शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एक योजना जाहीर करून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. या दिवशी पेट्रोल पंपावर प्रत्येक नागरिकाला १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल मिळेल, असा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. त्याशिवाय भाजपचे सदस्य असल्याचं कार्ड दाखवल्यास १ लिटर पेट्रोल मोफत मिळेल, अशीही घोषणा त्यांनी केली होती. विशेष म्हणजे ज्या पेट्रोल पंपावर हा कार्यक्रम घेण्यात आला, तो नारायण राणेंच्या मालकीचा होता.

    नागरिकांना पेट्रोल खरेदीसाठी आमदार वैभव नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असतानाच भाजपचे कार्यकर्ते तिथं आले आणि त्यांनी या प्रकाराला आक्षेप घेतला. त्यावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील वाद वाढत गेला आणि हाणामारीला सुरुवात झाली. आमदार नाईकही या हाणामारीत सहभागी झाले. मात्र वेळीच पोलिसांनी पुढाकार घेऊन दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी पांगापांग केल्यामुळे अनर्थ टळला.

    भाजपला खिजवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना १ लिटर पेट्रोल मोफत देण्याची घोषणा नाईकांनी केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. तर शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त नागरिकांना एक लिटर पेट्रोल मोफत देण्याचा कार्यक्रम होता. त्यावर भाजपने चिडण्याची काहीच गरज नव्हती, असा दावा शिवसेनेनं केलाय.