सिंधुदुर्गात राष्ट्रवादीला मोठा झटका, शरद पवारांच्या या समर्थकाने केला भाजपात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हण यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्य कोलमडण्याची शक्यता आहे. नाराण राणे यांच्या नीलरत्न या निवासस्थानी हा सोहळा पार पडला आहे.

सिंधुदुर्ग : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी अत्याधुनिक कोवीड-१९ लॅबचे लोकार्पण केले. तसेच शरद पवारांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक गुलाबराव चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे कोकणात एकच खळबळ माजली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हण यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्य कोलमडण्याची शक्यता आहे. नाराण राणे यांच्या नीलरत्न या निवासस्थानी हा सोहळा पार पडला आहे. यावेळी नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि भाजपचे इतर मंडळी उपस्थित होते. 

राष्ट्रवादीचे गुलाबराव चव्हाण हे गेले ३० वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक भुषवत आहेत. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. तर काही लोक राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खोटी अफवा पसरवत आहेत. राष्ट्रवादीचे कोणताही आमदार भाजपच्या संपर्कात नाही आहे. असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.