नुकसानीचे पंचनामे करून देखावा करणाऱ्यांकडून नुकसानग्रस्तांना मदत कशी मिळणार? भाजप आमदार नितेश राणेंचा सवाल

नुकसानीचे पंचनामे करून केवळ देखावा करणाऱ्यांकडून नुकसानग्रस्तांना मदत कशी मिळणार? असा सवाल भाजपचे युवा आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी आज पत्रकार परिषदेत(Press Conference) केला आहे.

  कणकवली : मी कोरोना काळात भरीव मदत करत आहे. स्वतः ऑक्सिजनचे सिलेंडर दिले, मास्क, पीपीई किट दिले. तसेच सत्ताधारी आमदारांनी थेट मदत देण्याचे काम करावे. या जिल्ह्यात एकही निवडणूक मी हरलो नाही पण लोकांना मदत देण्यात जर हे सत्ताधारी लोक माझ्या पुढे गेले तर मी त्या विषयात हरायला मी तयार आहे असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे(Nitesh rane) यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री लोकांना मदत करत नसल्याचा आरोप केला आहे.

  शासनाकडून मदत आणू शकत नाहीत

  सरकार, पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार फक्त वादळग्रस्त भागाचा दौरा करून फोटोसेशन करत आहेत. नुकसानीचे पंचनामे करून केवळ देखावा करणाऱ्यांकडून नुकसानग्रस्तांना मदत कशी मिळणार? असा सवाल भाजपचे युवा आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी आज पत्रकार परिषदेत(Press Conference) केला आहे.

  नितेश राणे पुढे म्हणाले की, निसर्ग वादळाच्या वेळी सिंधुदुर्गसाठी २५ कोटीची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे ८ कोटी ८० लाख मागितले. प्रत्यक्षात केवळ ४९ लाख मिळाले ही या शासनाची विसंगती आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी शासनाकडून मदत आणू शकत नाहीत किंवा वैयक्तिक मदत करू शकत नाहीत हे काय विकास करणार? जनतेला न्याय कसा देणार ? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

  पंचनाम्यानंतर मदत कशी देणार
  सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद सदस्य फोडण्यासाठी शिवसेनेकडे पैसा आहे. पण या नुकसानग्रस्त बांधवांना घ्यायला पैसा नाही. नुसते फोटोसेशन करत राहून लोकांना न्याय कसा मिळणार ? असा प्रश्न राणेनी उपस्थित केला.

  इतकंच नाहीतर आम्ही लवकरच राज्यपालांना भेटून नुकसानग्रस्तांसाठी मदत देण्याची मागणी करणार आहोत असंही राणे म्हणाले. नुसते पंचनामे करून रद्दी वाढवायची आहे का असाही सवाल राणेंनी केली आहे. पंचनामे करा असे सत्ताधारी सांगताहेत पण पंचनाम्यानंतर मदत कशी देणार याची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. निसर्ग वादळाचे पंचनामे झाले पुढे काहीच झाले नाही. असा आरोपही आमदार राणे यांनी केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुढचे तीन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत, याचीही माहिती राणेंनी दिली.