जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन; नितेश, निलेश राणेंसह भाजपा- शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजपा व सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल केले आहेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह 30 ते 40 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजपा व सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल केले आहेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह 30 ते 40 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    भाजपाचे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह 50 ते 60 व्यक्तींवरदेखील गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला कालपासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

    या यात्रेदरम्यान कणकवली येथील सभेत राणे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे करोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.