हवामान खराब असल्याने मच्छीमार नौका बंदरावर आण्यात आल्या…..

अलीकडे काही दिवस किनारपट्टी भागातील वातावरण सतत बदलते राहिले आहे. समुद्रात वाढळसदृश्यस्थिती निर्माण झाल्यामुळे सुरक्षितता म्हणून मच्छीमारी नौका देवगड बंदरात परतल्या.

    सिंधुदुर्ग: हवामान खराब असल्याने मच्छीमार नौका बंदरावर आण्यात आल्या ४८ नौका सह ४०० मच्छिमार किनारपट्टी वर आले आहेत. वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी जोरदार चालु झाले आहे. किनारपट्टी भागातील वातावरण सतत बदलत आहे. देवगड बंदरावर मच्छिमार व नौका आश्रायासाठी आले आहेत. समुद्रात वादळसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे

    जिल्ह्यात देवगड बंदरात अरबी समुद्रातील परतल्या. तसेच परराज्यातील नौकाही बंदरात आश्रयाला आल्या आहेत. बाहेरच्या सुमारे ५२ नौका बंदरात आश्रयाला आल्या आहेत. किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. अलीकडे काही दिवस किनारपट्टी भागातील वातावरण सतत बदलते राहिले आहे. समुद्रात वाढळसदृश्यस्थिती निर्माण झाल्यामुळे सुरक्षितता म्हणून मच्छीमारी नौका देवगड बंदरात परतल्या. गुजरात येथील मच्छिमारी नौका देवगड बंदरात आश्रयासाठी आल्या आहेत. त्यानंतरही सातत्याने वातावरणात बदल होत राहिल्याने बाहेरील मच्छीमारी नौकांची संख्या वाढतच राहिली. देवगड बंदरात बाहेरील राज्यातील सुमारे ४८ मच्छिमारी नौका दाखल झाल्या आहेत. त्यावर साधारणपणे ४०० मच्छीमार आहेत. कोकण किनारपट्टीवरील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून देवगड बंदराची ओळख आहे