uddhav And nitesh

कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासा करीता कोणासोबतही एकत्र येण्याची वेळ आली तर खांद्याला खांदा लावून काम करु असे वक्तव्य नितेश राणे यानी केले. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर हे शिवसेना नेते हजर होते तर भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी भविष्यात शिवसेनेसोबतही जुळवून घेण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.

    वेंगुर्ला : नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्या नंतर त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य करत शाब्दीक प्रहार केले होते. त्यानंतर कोकणात आणि मुंबईत भाजप विरोधात शिवसेना असा सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आज वेंगुर्ला नगर परिषदेच्या मत्स्य बाजारपेठ लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात शिवसेना भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत भाजप आमदार नितेश राणे यानी केलेल्या वक्तव्याने पुन्हा सेना भाजप युती होण्याच्या चर्चाना उधाण आले आहे.

    विकासा करीता कोणासोबतही एकत्र

    कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासा करीता कोणासोबतही एकत्र येण्याची वेळ आली तर खांद्याला खांदा लावून काम करु असे वक्तव्य नितेश राणे यानी केले. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर हे शिवसेना नेते हजर होते तर भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी भविष्यात शिवसेनेसोबतही जुळवून घेण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.

    जुळवून घेण्याचे संकेत

    यावेळी राणे म्हणाले की, आजचा एक दिवस नगरपरिषदचेया कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर चांगले चित्र पहायला मिळत आहे. राणे यांच्या या वक्तव्यातून त्यांनी भविष्यात सेना भाजप युती पुन्हा झाली तरी जुळवून घेण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.