सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला चालना देणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोकणातील विविध प्रश्नांबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी कोकणातील आमदारांची बैठक काल मंगळवारी वर्षा निवासस्थानी घेतली.

कणकवली: सिंधुदुर्ग जिह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला चालना (Government Medical College in Sindhudurg district) देण्यात येईल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केल्याची माहिती वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले की, कोकणातील विविध प्रश्नांबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी कोकणातील आमदारांची बैठक काल मंगळवारी वर्षा निवासस्थानी घेतली.

या बैठकीत माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) व आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज संदर्भातील बैठकीबाबत विचारणा केली. त्यावर लवकरच ही बैठक घेऊन शासकीय मेडिकल कॉलेजला चालना देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज होणे गरजेचे आहे. जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणताच आजार, साथरोग प्रसंगी इतर जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. सद्यस्थितीत आहे त्या आरोग्य सुविधांचा वापर करून जिल्ह्यात रूग्णांवर उपचार सूरू आहेत. परंतु शासकीय मेडिकल क़ॉलेज ही जिल्ह्याची गरज आहे. ती लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी मी केली होती. तसेच दीपक केसरकर व मी ‘बांदा ते चांदा’ योजनेच्या ऐवजी प्रस्तावित असलेल्या ‘सिंधू–रत्न-योजना’ लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.