‘मी जनतेला आर्थिक सक्षम करु शकतो’ – नारायण राणे

मला लघु व मध्यम उद्योगाचं खातं मिळालं आहे. या विभागामार्फत मी जनतेला आर्थीक सक्षम करुशकतो. उद्योजक करुशकतो, उद्योजकांकडून जनतेला रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतो. या विभागामार्फत तुम्हाला तुमचा उद्योग सुरु करण्यासाठी काही कोटींचं कर्ज मिळतं. त्यामुळे आता नकोते उद्योग सोडून द्या आणि आपल्या प्रगतिसाठी उद्योग सुरु करा.” असं आवाहन नारायण राणे यांनी कोकणवासीयांना केलं आहे.

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली मारण्याच्या वक्तव्यामुळे अटक करून जामिनावर सोडण्यात आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा आज शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे दाखल झाली. कणकवली या त्यांच्या होमग्राउंडवर राणें सभा देखील घेतली.

    यावेळी बोलताना राणे म्हणाले की, “मला मोदी साहेबांनी केंद्रीय मंत्रीपद दिलं ही तुम्हाला सर्वांना अभिमान वाटावा अशी घटना आहे. माझी अपेक्षा नसतानाही घरी फोन आला ‘तुम्हाला पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांनी भेटण्यासाठी बोलवलं आहे. तुम्हाला दिल्लीत बोलवलं आहे.’

    “दिल्लीत जाऊन जेव्हा पंतप्रधानांना भेटलो तेव्हा ते म्हणाले ‘तुम्ही कॅबीनेट मंत्री बनणार आहात. तुम्हाला संध्याकाळी शपथ घ्यायची आहे.”

    “मी जिल्ह्यात आल्यापासुन बघतोय ठिकठिकाणी प्रचंड गर्दी आहे. मला लघु व मध्यम उद्योगाचं खात मिळालं आहे. या विभागातर्फे मी जनतेला आर्थीक सक्षम करु शकतो. उद्योजक करु शकतो, उद्योजकांकडून जनतेला रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतो. या विभागामार्फत तुम्हाला तुमचा उद्योग सुरु करण्यासाठी काही कोटींचं कर्ज मिळतं. त्यामुळे आता नकोते उद्योग सोडून द्या आणि आपल्या प्रगतिसाठी उद्योग सुरु करा.” असं आवाहन नारायण राणे यांनी कोकणवासीयांना केलं आहे.