सिंधुदुर्गातील घटना; कोरोनाची लस घेण्यासाठी जाताना दाम्पत्याचा अपघाती मृत्यू…

अपघाताची माहिती मिळताचं सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, गणेश चव्हाण तसेचं ईतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

    सिंधुदुर्ग : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. दरम्यान या परिस्थितीत सिंधुदुर्गात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी जात असताना दाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये ही घटना घडली आहे. संजय जोशी आणि सायली जोशी असं या मृत दाम्पत्याचं नाव आहे. देवगडमध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी जात असताना दुचाकी व टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला, यात जोशी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

    दरम्यान रेडी रेवस या सागरी महामार्गावर वाडा सडेवाडी येथे टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरुन जात असलेले संजय जोशी व सायली जोशी दोघे जागीच ठार झाले आहेत. काल संध्याकाळच्या सुमारास देवगडमधील नाडण येथील जोशी दाम्पत्य दुचाकीने रेडी रेडव या सागरी महामार्गाने नाडणवरून देवगडला कोरोनाची लस घेण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे.

    अपघाताची माहिती मिळताचं सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, गणेश चव्हाण तसेचं ईतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.