आपल्या देशातल्या लोकांना मारायचं हा केंद्र सरकारचा धंदा; खासदार विनायक राऊत यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे जी मागणी केलेली आहे तीचा आदरनीय पंतप्रधानांनी सहानभुती पुर्वक माणूसकीच्या दृष्टीने विचार करून हवाई वाहतूकीद्वारे प्राणवायू हा आपल्या महाराष्ट्रात, मुंबईत पाठवण्याची आवश्यकता असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

    सिंधुदुर्ग : कोरोना लस आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. परदेशातल्या लोकांना आपलं काही तरी देण घेणं लागतं म्हणून त्यांना व्हॅक्सीन द्यायचं आणि आपल्या देशातल्या लोकांना मारायचं हा केंद्र सरकारचा धंदा चालू होता, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

    दरम्यान रेमडेसीवीरची निर्यात ताबडतोब थांबवण्याची आवश्यकता होती ती बऱ्याचं दिवसानंतर थांबवली त्यामुळे परदेशात जाणारी रेमडेसीवीर आता देशात यायला सुरूवात होईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांकडे ऑक्सिजनची मागणी केली त्याला पंतप्रधानांनी ऑक्सिजन द्यायची तयारी दाखवली माञ ती बंगालमधून. म्हणजे बंगाल ते मुंबई हा जर प्रवास बघीतला तर कशा पद्धतीने ते ऑक्सिजन देणार आहेत हे तूमच्या सर्वाच्या लक्षात येईल. असं राऊत म्हणाले.

    म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे जी मागणी केलेली आहे तीचा आदरनीय पंतप्रधानांनी सहानभुती पुर्वक माणूसकीच्या दृष्टीने विचार करून हवाई वाहतूकीद्वारे प्राणवायू हा आपल्या महाराष्ट्रात, मुंबईत पाठवण्याची आवश्यकता असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.