ब्रेक दि चेन’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ जूनपासून ‘स्तर ४ चे निर्बंध होणार लागू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

राज्यशासनच्या सुधारित नियमावलीनुसार, सिंधुदुर्गासाठी चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच सिंधुदुर्गात हे निर्बंध 'ब्रेक दि चेन' अंतर्गत 7 जूनपासून चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू होतील, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

  सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने राज्यशासनच्या सुधारित नियमावलीनुसार, सिंधुदुर्गासाठी चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच सिंधुदुर्गात हे निर्बंध ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत 7 जूनपासून चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू होतील, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

  ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यात कोरोनाबाधित दरानुसार (पॉझिटिव्हीटी रेटनुसार) शासनाने विविध पाच स्तर निश्चित केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. जिल्ह्यात 7 जूनपासून निर्बंध लागू राहतील, असं सांगत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी नियमावली जारी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा 12.70 टक्के असून ऑक्सिजन बेड्स व्यापलेली टक्केवारी 66.65 टक्के इतकी असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शासनाकडील आदेशान्वये चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.

  दरम्यान त्यानुसार साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील अधिकारास अनुसरून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार 7 जून पासून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.

  • सिंधुदुर्ग जिल्हा स्तर चारमध्ये समाविष्ट असल्याने मार्गदर्शक तत्वानुसार, सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 नंतर कोणत्याही प्रकारची हालचाल, संचार करता येणार नाही. तसेच आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
  • अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने, आस्थापनं – सर्व दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील.
  • मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिनसह), नाट्यगृहे बंद राहतील.
  • रेस्टॉरंट्संना फक्त पार्सलसेवा, घरपोच सेवा सुरु राहतील.
  • सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलिंग-सोमवार ते शुक्रवार पहाटे 5 वाजता ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील, तर आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवारी बंद राहतील.
  • खाजगी आस्थापनं, कार्यालये यांना सुट देणेत आलेली आहे. कार्यालयीन उपस्थिती, शासकीय कार्यालयेसहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) ही 25 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील. खेळ-मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत पर्यंत परवानगी असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवार बंद राहतील.
  • चित्रिकरण – सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 पर्यंत सुरक्षित आवारणामध्ये (बबल) ज्यात गर्दी होईल असे चित्रिकरण प्रतिबंधीत असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवारी चित्रिकरण करता येणार नाही.
  • धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, करमणूकीचे कार्यक्रम, मेळावे – बंद राहतील.
  • लग्नसमारंभ – जास्तीत जास्त 25 लोकांच्या उपस्थितीत पार पाडता येतील.
  • अंत्ययात्रा, अंतविधीस – जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी
  • बैठका, निवडणूक – स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा – 50 टक्के क्षमतेसह पार पाडण्यास परवानगी
  • बांधकाम – ज्या ठिकाणी कामगारांना राहणेची सोय असेल अशी बांधकामं सुरु राहतील.
  • कृषी आणि कृषी पूरक सेवा-सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • ई – कॉमर्स – वस्तू आणि सेवा : फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या ई-कॉमर्स सेवा सुरु राहतील.
  • संचारबंदीत व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर – 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वा. ते दुपारी 4 वा. पर्यंत सुरु राहतील.
  • सदर दुकानांत येणाऱ्या ग्राहकांनी पूर्व नियोजित वेळ ठरवून तसेच एसी सुरु न करण्याच्या अटीवर सुरु राहतील. तसेच सदर ठिकाणी फक्त लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक राहील.
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) – 50 टक्के क्षमतेसह सुरु राहतील ( प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.), माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक, मदतनीस, स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह – नियमीत सुरु राहतील.
  • खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांना अंतर जिल्हा प्रवास – नियमीत सुरु राहतील – परंतु सदर वाहनामधून स्तर पाचमध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रवाशी थांब्यावर उतरणार असलेस त्या प्रवाशास ई-पास बंधनकारक असेल.
  • उत्पादक घटक – निर्यातीशी संबंधित घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह – 50 टक्के कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरून प्रवास करून येणास असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर