uday samant

 सिंधुदुर्ग:  कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊनची अमंलबजावणी सुरू झाली आहे. हा लॉकडाऊन जनतेच्या हितासाठीच करण्यात येत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबतचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला.

लालबागचा राजा मंडळाने गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचेच अनुकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी या संसर्गाची साखळी तोडणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन केल्यामुळे ही संख्या आणखी कमी होवून जिल्हा कोरोना मुक्त होवू शकेल, असा विश्वास यावेळी सामंत यांनी व्यक्त केला आहे.