खासदाराच्या मुलाची पोलीस कर्मचाऱ्याला धमकी देत शिवीगाळ

  • निलेश राणेंनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे कि, खासदाराच्या मुलाने एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आहे. भर पावसात पोलीस कर्मचारी ड्यूटी बजावत आहे. खासदाराचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत शुद्धीत नसताना पोलीसाला शिवीगाळ करतोय. दारू पिऊन गाडी चालवल्यास पोलीस आडवणारच असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्ग – शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्यामुळे पोलीसांनी अडवल्यास अश्लिल शिवीगाळ करतानाच व्हिडिओ निलेश राणेंनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केला आहे. पोलीस अधिकारी भरपावसात ड्यूटी करत असताना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत शिवी देत आहे असे निलेश राणेंनी म्हटले आहे. 

या व्हिडिओत खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत हा दारु पिऊन पोलीस कर्मचाऱ्याशी भरपावसात भांडताना दिसत आहे. तो पोलीसाला अश्लिल भोषेत शिवीगाळ करत आहे. आपण खासदार विनायक राऊतांचा मुलगा असल्याचे म्हणत तुजी नोकरी खाऊन टाकेल अशी धमकी देत आहे.

निलेश राणेंनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे कि, खासदाराच्या मुलाने एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आहे. भर पावसात पोलीस कर्मचारी ड्यूटी बजावत आहे. खासदाराचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत शुद्धीत नसताना पोलीसाला शिवीगाळ करतोय. दारू पिऊन गाडी चालवल्यास पोलीस आडवणारच असेही ते म्हणाले. 

याप्रकरणावर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार विनायक राऊत म्हणाले की माजा मुलगा साधा सुपारीचेही व्यसन करत नाही. तरीही मी पोलीस अधीक्षकांना या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी असे सांगितले आहे. यातील दोषींवर कारवाई करण्याचे देखील आदेश दिले आहेत. जर माजा मुलगा दोषी आढळला तर त्यावर कारवाई करण्यात यावी, आणि जर पोलीस कर्मचारी उद्धट बोला असेल तर त्यांनाही समज द्यावा असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. मुलगाच गाडीत होता आणि ती गाडी मुलाचीच असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.