… यांना शेतीमधलं काय कळतं? ते समर्थन कसे करणार? ; नारायण राणेंनी ओढला विरोधकांवर आसूड

राहुल गांधींना आणि उद्धव ठाकरेंना (Rahul Gandhi and Uddhav Thackeray) शेतीमधलं काय कळतं? काहीच कळत नसल्याने ते समर्थन कसं करणार? विरोधच करणार.अशा शब्दांमध्ये भाजपा नेते नारायण राणे यांनी आज कणकवली (Kankavli ) येथून काँग्रेस नेते राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध करणाऱ्यांवर तोफ डागली.

नव्या कृषी कायद्यासाठी (new agriculture laws) विरोध करणाऱ्या नेत्यांवर भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी आसूड ओढला आहे. राहुल गांधींना आणि उद्धव ठाकरेंना (Rahul Gandhi and Uddhav Thackeray) शेतीमधलं काय कळतं? काहीच कळत नसल्याने ते समर्थन कसं करणार? विरोधच करणार.अशा शब्दांमध्ये भाजपा नेते नारायण राणे यांनी आज कणकवली (Kankavli ) येथून काँग्रेस नेते राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध करणाऱ्यांवर तोफ डागली.

काय म्हणाले नारायण राणे?

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितित भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपा नेते नारायण राणे बोलत होते.

शेतकऱ्यांच्या हिताचा हा नवा कृषी कायदा आहे. या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय? का इथं आंदोलनं होत आहेत? ही राजकीय आंदोलनं आहेत. यात समेट होईल असं मला वाटत नाही. राहुल गांधींना, उद्धव ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं? काहीच कळत नसल्याने ते समर्थन कसं करणार? विरोधच करणार. अशा शब्दांमध्ये नारायण राणे यांनी टीका केली आहे.