नारायण राणेंना विजेचा शॉक लागला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा एकदा सिंधूदूर्गातून सुरु झाली आहे. त्यांच्या या यात्रेदरम्यान राणेंना विजेचा शॉक बसला आहे. राणेंना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरुप असल्याचे समजते. मात्र, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा एकदा सिंधूदूर्गातून सुरु झाली आहे. त्यांच्या या यात्रेदरम्यान राणेंना विजेचा शॉक बसला आहे. राणेंना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरुप असल्याचे समजते. मात्र, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    राणे यांचे कणकवलीत आगमन झाल्यानंतर ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात होते. यावेळी येथील रेलिंगला लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईला राणंचा हात लागला. यावेळी विजेचा करंट लागल्याने राणेंनी झटकन हात मागे घेतला. राणेंना कोणतेही इजा पोहचलेली नाही.

    राणेंना विजेचा झटका लागलेला पाहून त्यांच्या मागे असलेल्या प्रवीण दरेकर यांनीही शिताफिने रेलिंगला लावलेला आपला हात मागे घेतल्याचे व्हिडिओत दिसत आहे.