नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी, चंद्रकांत पाटलांकडून कौतुक!

नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली. कारण, अमित शाह अशी व्यक्ती आहेत की, जे पंतप्रधानांना विनंती करु शकतात, सहकाऱ्यांना सूचना देतात आणि कनिष्ठांना आदेश देतात, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले आहे.

  कणकवली (Kankawali).  नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली. कारण, अमित शाह अशी व्यक्ती आहेत की, जे पंतप्रधानांना विनंती करु शकतात, सहकाऱ्यांना सूचना देतात आणि कनिष्ठांना आदेश देतात, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले आहे.

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली. कारण, अमित शाह अशी व्यक्ती आहेत की, जे पंतप्रधानांना विनंती करु शकतात, सहकाऱ्यांना सूचना देतात आणि कनिष्ठांना आदेश देतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

  याचबरोबर, नारायण राणे हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा नेता आहे. नारायण राणे यांनी अमित शाह यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावून एक स्वप्न साकार केले. आता त्यांनी कोकणात रोजगारनिर्मिती करण्यासाठी अमित शाह यांना विनंती करावी, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. याशिवाय, कोकणातील अनेकजण नोकऱ्यांसाठी मुंबईत जातात. हे लोक मुंबईतील झोपडपट्टीत आनंदाने राहत नाहीत. मात्र, त्यांना नाईलाजाने पोटापाण्यासाठी तेथे राहावे लागते. त्यामुळे नारायण राणे यांनी कोकणात रोजगारनिर्मितीसाठी अमित शाह यांना साकडे घालावे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

  नारायण राणेंवर भाजपामध्ये अन्याय होणार नाही- अमित शहा
  अमित शहा यांनीही नारायण राणे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. “नारायण राणे हे अन्यायाविरोधात पाय रोवून उभे राहणारे नेते आहेत. ते अन्याय होत असेल तर भविष्याचा कोणताही विचार न करता अन्यायाचा प्रतिकार करतात. म्हणूनच त्यांची वाटचाल ही वळणावळणाची राहीली आहे. त्यांचा सन्मान आणि आदर कसा करायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची ग्वाही मी देतो”, असे अमित शहा म्हणाले.

  नारायण राणे महाराष्ट्राचे दबंग नेते – देवेंद्र फडणवीस
  दबंग नेता म्हणून नारायण राणे यांची ख्याती आहे. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरुन ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणे हा फार धाडसी निर्णय होते. 650 हॉस्पिटल उभारणे हे खूप आव्हानात्मक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.