uddhav thackeray vs Narayan rane
uddhav thackeray vs Narayan rane

तीन वर्षांपूर्वीच्या विधानावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाकडून तक्रारांचा पाऊस पाडण्यात येत आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी भाषणाच्या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होेतं.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उद्यापासून सुरूवात होणार असल्याची घोेषणा नारायण राणे यांनी केली आहे. तसेच या जन आशीर्वाद यात्रेला सिंधुदुर्गात सुरूवात होणार आहे. परंतु सिंधुदुर्गात राज्य सरकारकडून (१४४ कलम ) जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात जमावबंदी लागू केल्यामुळे नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    तीन वर्षांपूर्वीच्या विधानावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाकडून तक्रारांचा पाऊस पाडण्यात येत आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी भाषणाच्या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होेतं. याबाबत आता भाजप नेते मुख्यमंत्र्यांवर तक्रारींचा पाऊस पाडत आहेत.

    दरम्यान, जन आशीर्वाद यात्रेला सिंधुदुर्गात परवापासून सुरूवात होणार आहे. परंतु राज्य सरकारकडून जमावबंदी लागू करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.