नारायण राणे महाराष्ट्राचे दबंग नेते; देवेंद्र फडणवीसांकडून कौतूक!

महाराष्ट्राचे दबंग नेता म्हणून नारायण राणे यांची ख्याती आहे. अनेक लोक स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणे हे सोपे पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणे हा फार धाडसी निर्णय होता. ६५० खाटाचे हॉस्पिटल उभारणे हे खूप आव्हानात्मक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    सिंधुदुर्ग : मुंबई महापलिकेच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा नारायण राणे यांची आठवण काढल्याचे सांगण्यात येत आहे. नारायणराव राणे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. झोप विसरून ते मेहनत करतात. आज मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले आहे. सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

    महाराष्ट्राचे दबंग नेता म्हणून नारायण राणे यांची ख्याती आहे. अनेक लोक स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणे हे सोपे पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणे हा फार धाडसी निर्णय होता. ६५० खाटाचे हॉस्पिटल उभारणे हे खूप आव्हानात्मक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    मी स्वत: अतिशय जवळून राणेंचा संघर्ष बघितला. महाविद्यालय उभारताना अनेक अडचणी आल्या. इतकी गुंतवणूक केल्यानंतर वर्ष-दोन वर्ष वाट पाहावी लागते. या सगळ्या गोष्टींना सामोरे जात त्यांनी सगळा पाठपुरावा केला. अखेर या स्वप्नपूर्तीचा आनंद राणेंच्या चेहऱ्यावर पाहतोय, असे त्यांनी सांगितले.

    या कार्यक्रमात एक कमतरता आहे. या कॉलेजच्या अध्यक्षाखाली बसल्या आहेत. बाकी आपण सगळे वर बसलो आहोत. पण राणेंच्या यशामागचं रहस्य तेच आहे. वहिनी मागे राहून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात. त्यामुळे यशाची वेगवेगळे शिखरे राणे पादक्रांत करत असतात, असे फडणवीस म्हणाले त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. दादा हे काय आपल्याला नवीन आहे का? समृद्धी महामार्ग करताना किती अडचणी आल्या. किती खो घालण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राला माहीत आहे. श्रेय मिळत नसेल तर विरोध करायचा आणि तरीही काम झाले तर त्याचे श्रेयही घ्यायचे असे काम हे लोक करत असतात, असा टोला फडणवीस यांनी शिवसेनेला नाव न घेता लगावला.