May God save Konkan from such fools Nitesh Rane criticizes Vinayak Raut

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातला आहे. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगातही टाकणार होते असा गौप्यस्फोट विनायक राऊतांनी केला आहे. पण, नारायण राणे भाजपाला शरण गेल्याने कारवाई टळली. आम्ही मनात आणलं, तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती केस ओपन झाली, तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत,” असा दावाही विनायक राऊत यांनी केला आहे

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर त्यांनी एकाला 12 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. विनायक राऊतांच्या आरोपामुळे राणे कुटुंब आणि शिवसेना यांच्यातील वैर पून्हा एकदा समोर आले आहे.

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातला आहे. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगातही टाकणार होते असा गौप्यस्फोट विनायक राऊतांनी केला आहे.

पण, नारायण राणे भाजपाला शरण गेल्याने कारवाई टळली. आम्ही मनात आणलं, तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती केस ओपन झाली, तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत,” असा दावाही विनायक राऊत यांनी केला आहे.

राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून नारायण राणे दोन महिन्यांपूर्वी दिवसातून तीन-तीन वेळा मातोश्रीवर फोन करत होते. राऊत यांनी केलेल्या या आरोपामुळे नितेश यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.