माझ्या जीवाचं काही बरेवाईट झाले तर… नारायण राणेंचा ठाकरे सरकारला इशारा

मनसेप्रमुखराज ठाकरेंसह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षाव्यवस्था घटवण्याचा निर्णय रविवारी राज्य सरकारने घेतला. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

रत्नागिरी : मनसेप्रमुखराज ठाकरेंसह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षाव्यवस्था घटवण्याचा निर्णय रविवारी राज्य सरकारने घेतला. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

राज्य सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली याबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही. दहशतवादी लोकांकडून माझ्या जीविताला धोका असल्याने मुंबई पोलिसांनी मला सुरक्षा पुरवली होती.

माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे मात्र, राज्य सरकारने माझी सुरक्षा काढली. सुरक्षा पक्ष नाही तर सरकार देत असल्याचेही राणे यांनी ठाकरे सरकारला सुनावले

माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा सणणीत इशारा नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.