मतलई वाऱ्याने फिरले गणित, खवय्यांच्या ताटातून मासे होणार गायब

समुद्रात सुटलेल्या मतलई वाऱ्यांचा परिणाम हा मासेमारी करणाऱ्यांच्या उद्योगावर होत असतो. या वाऱ्यांमुळे मासे पकडण्यासाठी जाळी टाकण्यात अनेक अडथळे येतात. जरी जाळी टाकली तरी गुरफटली जाते. समुद्रात मासेमारी करायला जाऊन हाती काहीच लागत नाही. त्यामुळे फायदा तर दूरच, उलट शेतकऱ्यांचं मोठं नुकसान मासेमारीमुळे होत आहे.

सध्या मत्स्यदुष्काळाचं मोठं संकट मासेमारी उद्योगासमोर उभं ठाकलंय. त्यामुळं खवय्यांच्या ताटातून मासळी गायब होण्याची दाट शक्यता आहे. समुद्रात सध्या मतलई वारे धुमाकूळ घातल आहेत.

समुद्रात सुटलेल्या मतलई वाऱ्यांचा परिणाम हा मासेमारी करणाऱ्यांच्या उद्योगावर होत असतो. या वाऱ्यांमुळे मासे पकडण्यासाठी जाळी टाकण्यात अनेक अडथळे येतात. जरी जाळी टाकली तरी गुरफटली जाते. समुद्रात मासेमारी करायला जाऊन हाती काहीच लागत नाही. त्यामुळे फायदा तर दूरच, उलट शेतकऱ्यांचं मोठं नुकसान मासेमारीमुळे होत आहे.

जी काही थोडीफार मासळी मिळते, त्याला बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे समुद्रात जाऊन मासेमारी करण्याचा खर्चदेखील निघत नाही. मासेमारीसाठी आवश्यक असणारे पेट्रोल आणि बर्फ यांचा खर्चदेखील निघत नसल्याचं मासेमार सांगतात. त्यामुळे पदरचे पैसे घालून किती काळ मासेमारी करणार, असा प्रश्न मच्छिमारांसमोर आहे.

त्यामुळे वाऱ्यांची ही समस्या सुटेपर्यंत बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवणे, हाच उत्तम पर्याय असल्याचं खलाशांना वाटत आहे.