
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात थेट सामना रंगला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे. नितेश राणे यांच्या पुढाकाराने २८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातील वर्चस्व कायम असल्याचे दिसत आहे.
सिंधुदुर्ग: ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात थेट सामना रंगला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे. नितेश राणे यांच्या पुढाकाराने २८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातील वर्चस्व कायम असल्याचे दिसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या १०३ जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यातील २८ ग्रामपंचायत सदस्य राणेंच्या पुढाकाराने बिनविरोध निवडून आले आहेत.
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजले आहे. मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १४ जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे. दरम्यान, सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.