‘सामनातून वैयक्तिक टीका करणं थांबवा नाही तर..’ राणेंचा शिवसेनेला थेट इशारा

“शिवसेनेने सामनातून वैयक्तिक टीका करणे थांबवलं नाही तर मीदेखील प्रहारमधून हल्ला सुरु करेन. कोणाचं उठणं -बसणं, कुठे काय असतं, काय करतात, कोणत्या केसमध्ये काय सुरु आहे याची मला संपुर्ण माहिती आहे. अनिल परब आणखी किती दिवस लपणार. शेवटी मिळालना चुकून….राष्ट्रपती, पंतप्रधान असल्याप्रमाणे आदेश देत होते,” असं देखील राणे यांनी म्हटलं आहे.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. या यात्रेतील शेवटची पत्रकार परिषद कुडाळ येथे झाली. यावेळी राणेंनी संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखांना प्रहार मधून रोखठोक उत्तर देणार असल्याचे जाहिर केलं आहे. त्यामुळे आता सामना विरुध्द प्रहार असा संघर्ष बघायला मिळणार आहे.

    यावेळी बोलताना राणे म्हणाले की, “पंतप्रधानांच्या आदेशानुसार यात्रा सुरळीत सुरु होती. मात्र, काही ठिकाणी मांजर अडवी गेल्याने काही अपशकून झाले. माझ्या मुलांवर टीका करणारे अग्रलेख वैगेरे छापत आहेत. पण संजय राऊत यांनी आधी आपली मुलं किती पराक्रमी आहेत, मालकाची मुलं काय करतात हे पाहावं. संजय राऊत या एका माणसामुळे शिवसेना पक्षाची अधोगती होत आहे. माझ्या मुलांवर टीका करु नका. माझी दोनही मुलं हुशार आणि शिकलेले आहेत.”  असा इशारा राणेंनी दिला आहे.