सिंधुदुर्गात गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना नियमावली जाहीर

सिंधुदुर्गात गणेशोस्तवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी १६ कलमी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट दिवसांदिवस वाढतच आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सिंधुदुर्घचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

 सिंधुदुर्ग – कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारने क्वारंटाईन तसेच कोरोनाबाबतच्या नियम आणि अटींमध्ये अनेक प्रकारची शिथिलता दिली आहे. सिंधुदुर्गात गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी १६ कलमी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट दिवसांदिवस वाढतच आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सिंधुदुर्घचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

 या आहेत महत्त्वपूर्ण सुचना –   

१२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांना १० दिवसांचे होम क्वारंटाईन लागू राहणार आहे.

खासगी वाहनांनी कोकणात येणाऱ्यांसाठी ई-पास अनिवार्य असणार आहे.

यावर्षी सिंधुदुर्गात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा.  तसेच आगमन विसर्जनाला मिरवणूक काढू नये.

गणपतीची पूजा पुरोहितामार्फत न करता स्वत: करावी किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून करावी. 

आरती, भजने, फुगड्या, गौरी, वसा आदी कार्यक्रमांसाठी घरात एकवटता येणार नाही. 

कार्यक्रमानिमित्त घरोघरी भेटी देणे टाळावे आणि गावच्या वाडीतील गणपतींचे विसर्जन एकत्रित करू नये.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तहसिलदारांची परवानगी घेऊनच छोट्या मंडपात गणेशोत्सव साजरा करावा.

दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळले जाईल याची काळजी घ्यावी.

त्याचबरोबर एक महत्त्वपूर्ण सुचना म्हणजे १२ ऑगस्टनंतर गावी येणाऱ्या चाकरमान्यांना ४८ तास अगोदर कोरोना टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. तसेच कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असावा लागेल. त्यानंतर निगेटिव्ह अहवाल घेऊन येणाऱ्या चाकरमान्यांना होम क्वारंटाईन बंधनकारक असणार आहे.