Passenger flights will start from March 1 at Chippewa Airport; Ticket prices were also announced

    सिंधुदूर्ग : केंद्रीय मंत्री नारायणराणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान, शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद चांगलाच उफाळून आला. यानंतर आता शिवसेनेवर राणेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

    गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विमानतळ सुरू करण्याचे प्रयत्न होते.मात्र, कार्यवाही वेळेत पूर्ण होऊ शकली नाही यामुळे दिल्लीला जाऊन हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतल्याचे राऊत यांनी सांगीतले.

    यानंतर चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी डीजीसीआयने अखेर परवानगी दिली आहे. चिपी विमानतळाचे काम पूर्णपणे झालेले आहे. लायसन्स मिळालेलं आहे असं हवाई वाहतूक मंत्र्यांना सांगितल्याचं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं.

    7 ऑक्टोबर पासून हवाई वाहतूक सुरू करायला सज्ज आहोत, अशा पद्धतीचं लेखी पत्र कंपनीची विमान वाहतूक करणाऱ्या विभागाने दिल्याचे राऊत म्हणाले. हे विमातळ 100 टक्के क्षमतेने कार्यन्वित होणार आहे. सिंधुदुर्ग ते मुंबई विमान प्रवासाचे तिकीट 2500 इतकी असमार आहे. राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीच केलं नाही, अशी टोलाही राऊतांनी लगावला आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]