Shiv Sena MP Vinayak Raut criticizes Narayan Rane

नाराणय राणेंना काही कामधंदा उरलेला नाही. भाजपने सुद्धा त्यांना अडगळीत फेकून दिले आहे. राणेंना धड हिंदी बोलता येत नाही. इंग्रजीचा तर पत्ताच नाही. त्यामुळे दिल्लीत जाऊन करायचे काय? तर असे काही तरी पत्र द्यायचे. त्यामुळे त्यांनी हे पत्र दिले. इतकंच काय ते या पत्राचे महत्त्व आहे. केवळ कुठे तरी बातमी छापून येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी राणेंची ही धडपड आहे असे टीकास्त्र विनायक राऊतांनी सोडले. 

    सिंधुदुर्ग :  भाजपा नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्याबाबतचे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठविले होते. राणे यांचे हे पत्र शाहांनी केराच्या टोपलीत फेकून दिले असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रया देताना राऊत यांनी राणेंवर टीका केली.

    नाराणय राणेंना काही कामधंदा उरलेला नाही. भाजपने सुद्धा त्यांना अडगळीत फेकून दिले आहे. राणेंना धड हिंदी बोलता येत नाही. इंग्रजीचा तर पत्ताच नाही. त्यामुळे दिल्लीत जाऊन करायचे काय? तर असे काही तरी पत्र द्यायचे. त्यामुळे त्यांनी हे पत्र दिले. इतकंच काय ते या पत्राचे महत्त्व आहे. केवळ कुठे तरी बातमी छापून येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी राणेंची ही धडपड आहे असे टीकास्त्र विनायक राऊतांनी सोडले.

    राणे हे एक अतृप्त राजकारणी आहेत. त्यांचा नेहमीच मुख्यमंत्रीपदावर डोळा राहिला आहे. मुख्यमंत्रीपदाचं त्यांचं स्वप्न यशस्वी झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही, असा चिमटा काढतानाच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही. तशी परिस्थिती येणारही नाही, असेही राऊत म्हणाले.