आपले खाते सांभाळावे, मी अजून राष्ट्रवादीकडे वळलो नाही; राणेंचा थेट अजित पवारांना इशारा

कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेचा समारोप होताना त्यांनी आपला निशाणा वळवित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागली. पवार अजून अज्ञात आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी आपले खाते सांभाळावे मी अजून राष्ट्रवादीकडे वळलो नाही असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.

    सिंधुदूर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून निवड केल्याने मोदीच्या आदेशाप्रमाणे जनआशीर्वाद यात्रा काढली शिवसेनेत मात्र नारायण राणेंविरोधात बोलल्यावर उत्तम पदे मिळतात त्यामुळे काही मांजरे यात्रेला आडवी गेली,’ अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्रीराणे यांनी समारोपात केली.

    कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेचा समारोप होताना त्यांनी आपला निशाणा वळवित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागली. पवार अजून अज्ञात आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी आपले खाते सांभाळावे मी अजून राष्ट्रवादीकडे वळलो नाही असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.

    अजित पवार अजून अज्ञान आहे. त्यांनी खात्याचे बघावे. मी अजून राष्ट्रवादीकडे वळलो नाही. आपल्यावर असलेल्या आरोप आणि केसेस कशा लढायच्या कोणी अजित पवारांकडून शिकले पाहिजे असा टोलाही राणेंनी लगावला.