ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणासाठी सिंधुदुर्ग पॅटर्न लागू करावा, आमदार नितेश राणेंचा सल्ला

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पत्रकारांना कालपासून लसीकरण सिंधुदुर्गात सुरू झाले. त्यामुळे ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणाबाबत बोध घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पत्रकार लसीकरण पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सरकारकडे केलीय.

    सिंधुदुर्ग : ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणासाठी सिंधुदुर्ग पॅटर्नचा बोध घ्यावा, असा सल्ला भाजपा आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane) यांनी दिलाय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पत्रकार लसीकरण पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा, असेही त्यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जिल्हा असल्याचंही नितेश राणेंनी अधोरेखित केलंय.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारितेला संपूर्ण जगतात एक वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत आणि उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी आपली प्रबळ इच्छाशक्ती दाखवत एक संपूर्ण राज्याला आदर्श दाखवून दिला.