मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत, इतर जिल्ह्यांमध्ये का जात नाहीत; देवेंद्र फडणवीस यांची टीका

भाजपच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी देवगड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही?, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    देवगड : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. याचं पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौरेदेखील सुरु झालेत. या दौऱ्यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप – प्रत्यारोप केले जात आहे. विरोध पक्षनेते दोन दिवसांपासून कोकणमध्ये नुकसान झालेल्या भागांचा पाहणी दौरा करत आहेत. यादरम्यान त्यांनी मुख्यमंतत्र्यांवर निशाणा साधला आहे.

    म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरात दौरा केल्यावरून टीका केली जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले असून, मुख्यमंत्री इतर जिल्ह्यात का गेले नाहीत, असा सवाल फडणवीसांनी केला आहे. भाजपच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी देवगड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही?, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    मुख्यमंत्री केवळ बाता मारत आहेत

    मुख्यमंत्री केवळ बाता मारत आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच सवाल करायचा का? अशी विचारणा करताना गतवर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही?

    एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की राजकारण करू नका, पण दुसरीकडे प्रत्यक्षात टीका करतात. मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?, अशी विचारणा करत वादळाची पूर्वसूचना असतानाही एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही? कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचे पंचनामे कधी होणार? नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार?, असे अनेकविध प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केले.