सरकार 100% मदत करू शकत नाही; आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे मत

चक्रीवादळामुळे कोकणचे मोठे नुकसान झाले. येथील लोकांना मदतीची गरज आहे. मात्र, कुठलेही सरकार 100% मदत करू शकत नाही, असे मत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. राज्य सरकार आर्थिक अडचण असतानासुद्धा कोकणाच्या पाठीशी उभे आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. सर्वसामान्यांसह कोकणातील उद्योगाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना सुध्दा मदत करण्याची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. सर्वसमावेशक मार्ग काढून वादळात नुकसान झालेल्याना मदत करू, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

    सिंधुदुर्ग : चक्रीवादळामुळे कोकणचे मोठे नुकसान झाले. येथील लोकांना मदतीची गरज आहे. मात्र, कुठलेही सरकार 100% मदत करू शकत नाही, असे मत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. राज्य सरकार आर्थिक अडचण असतानासुद्धा कोकणाच्या पाठीशी उभे आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. सर्वसामान्यांसह कोकणातील उद्योगाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना सुध्दा मदत करण्याची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. सर्वसमावेशक मार्ग काढून वादळात नुकसान झालेल्याना मदत करू, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व वेंगुर्ले तालुक्यातील काही गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंत्यत दुर्गम भागात सुध्दा जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह पाहणी केली. कोकणात घराचे मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या वादळामुळे फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही अनेक गावांत विद्युत पुरवठा खंडित आहे. जवळपास तीन लाख घरांच्या कनेक्शन पैकी दोन लाख लोकांची वीज कनेक्शन जोडले गेले आहेत. एक निश्चित आहे, फार मोठी कॅज्युलेटी अद्याप झालेली नाही. वादळाच्या पूर्वी अलर्ट केले होते. त्यासंदर्भात बैठक मी आणि मुख्यमंत्री यांच्यात झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निर्देश देऊन सर्व मच्छिमारांना समुद्रातून सुरक्षित आणले, असे वडेट्टीवार म्हणाले.