कोकणात दाखल होतायत हजारो नागरिक, यंत्रणेवर येतोय दबाव, नागरिकांचेही हाल

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या जवळपास सर्व गाड्यांची बुकिंग दोन महिन्यापूर्वीच फुल्ल झाली होती. कोकणातील सिंधुदुर्गसह इतर रेल्वे स्थानकांवर शनिवारी आणि रविवारीही प्रवासी मोठ्या संख्येनं दाखल होतायत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे सक्तीचे करण्यात आले आहे. या चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला असला, तरी अनेक प्रवाशांनी ही चाचणी न करताच कोकणात आल्याचं दिसून आलं. 

    मुंबईतील कोरोनाचा वाढता उद्रेक, लॉकडाऊनची शक्यता आणि तोंडावर आलेला गुढीपाडवा या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईतले कोकणवासीय आपापल्या गावी जाणंच पसंत करत आहेत. गुढीपाडव्यापूर्वीचा विकेंड असल्यामुळे अनेकांनी अगोदरच या दिवशी रेल्वेचं बुकिंग करून ठेवलं होतं.

    मुंबईतून कोकणात जाणाऱ्या जवळपास सर्व गाड्यांची बुकिंग दोन महिन्यापूर्वीच फुल्ल झाली होती. कोकणातील सिंधुदुर्गसह इतर रेल्वे स्थानकांवर शनिवारी आणि रविवारीही प्रवासी मोठ्या संख्येनं दाखल होतायत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे सक्तीचे करण्यात आले आहे. या चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला असला, तरी अनेक प्रवाशांनी ही चाचणी न करताच कोकणात आल्याचं दिसून आलं.

    दरम्यान, कोकणातील एसटी सेवा पूर्णतः बंद असल्यामुळे आणि रिक्षांची संख्या मर्यादित असल्यामुळे रेल्वे स्थानकांवरून घरी पोहोचताना प्रवाशांची चांगलीच तारांबळ झाली. रिक्षावाल्यांनी कोरोनाचे निकष मोडत मर्यादित संख्येपेक्षा अधिक प्रवासी रिक्षात बसवल्यामुळे अनेक रिक्षाचालकांवर कारवाईदेखील करण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या रिक्षा वगळता इतर सर्व रिक्षाचालकांनी सुट्टी घेतली होती.

    काही प्रवाशांनी खासगी वाहने मागवून घेत तर काहींनी रिक्षाचालकांना अधिक पैसे देत घर गाठलं. अनेक प्रवाशांना पायपीट करत घर गाठावं लागलं.