नारायण राणे आणि शिवसेना खासदारामध्ये तुफान राडा; कार्यकर्तेही आप-आपसात भिडले

भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यामध्ये शाब्दिक झाली आहे. जिल्हा नियोजन बैठकीत या दोन्ही खासदारांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्तेही आप-आपसात भिडले.

सिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यामध्ये शाब्दिक झाली आहे. जिल्हा नियोजन बैठकीत या दोन्ही खासदारांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्तेही आप-आपसात भिडले.

तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून राऊत-राणे यांच्यात वाद झाला. यानंतर बैठकीत एकच गोंधळ उडाला. हा वाद टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

सामंत यांना तिलारी धरणाच्या फुटलेल्या कालव्याबद्दल संबंधित विभागाची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन द्यावे लागले. सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतर राऊत आणि राणे समर्थक शांत झाले.

दरम्यान, नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये असलेलं वैर सर्वश्रूत आहे. ऐरवी अप्रत्यक्षपणे टीका करणाऱ्या या नेत्यांमध्ये समोरासमोरच जुंपली. या राजकीय राड्याची कोकणात जोरदार चर्चा सुरु आहे.