सिंधुदुर्गात गैरव्यवहाराबाबत भ्रष्टाचाराचा प्रकार…

सिंधुदुर्गः  कोरोनावर मात करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याचदरम्यान सिंधुदुर्गात मोठा गैरव्यवहार होत असल्याचं समोर आलं आहे. महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याचे वितरण महसूल खात्याकडून मार्फत होते सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून कुडाळ प्रांतांच्या कक्षेतील एका प्रकरणात हा प्रकार घडला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खिरमाळे यांना जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवल्यामुळे खळबळ उडाली आहे.  मुंबई-गोवा महामार्गासाठी जमीन गेलेल्या उर्वरित जमीन मालकांची मोबदल्याची रक्कम प्रांताधिकारी कार्यालयात आली आहे. ती वितरित करण्यात येत आहे. मात्र याबाबत त्रुटी काढून प्रांत कार्यालयातील अधिकारी पैसे उकळतात असा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे.

गेले अनेक दिवस कुडाळ प्रांत अधिकाऱ्यांच्या जनतेतून तक्रारी येत होत्या. आता हे प्रकार उघडकीस येत आहेत. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, माझ्या मतदारसंघात भ्रष्टाचाराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, लोकांना त्रास झालेला खपवून घेणार नाही. कुडाळ मालवणसह जिल्ह्यात भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना थारा देणार नाही. असे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ प्रांतधिकारी सौ वंदना खरमाळे यांना सुनावले. प्रांताधिकारी म्हणून तुम्ही चौकशी करा तुमच्या कार्यालयाचे नाव सांगत एका अधिकाऱ्याने पैसे घ्यायला सांगितले असे उघडकीस आले आहे. नसेल तर त्याच्या विरोधात पोलीस तक्रार द्या असंही आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं.