Union Home Minister Amit Shah accepted Narayan Rane's invitation to visit Sindhudurg

भाजपा खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधले आहे. याच्या उद्घाटनासाठी राणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे. तसेच मै १०० टक्का आऊंगा असे म्हणत या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आश्वासनच राणेंना दिले.

    सिंधुदुर्ग : भाजपा खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधले आहे. याच्या उद्घाटनासाठी राणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे. तसेच मै १०० टक्का आऊंगा असे म्हणत या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आश्वासनच राणेंना दिले.

    रविवारी ७ फेब्रुवारी रोजी हा उद्घाटन सोहळा होणार आहे. राणेंनी शहांची प्रत्यक्ष भेटून त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राणे कोकणात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याचीही चर्चा आहे. कोकणातील वजनदार नेते अशी राणेंची ओळख आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सहावेळा निवडणूक जिंकली आहे.

    कुडाळा तालुक्यातील पडवी गावात खासगी ७० एकर जमिनीवर हे हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात केली होती. मागच्या सात दशकांपासून सिंधुदुर्ग जिल्हा चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित आहे. यामुळे या रुग्णालयाचा स्थानिकांना निश्चितच लाभ होईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.