सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाची वाहतूक सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त , विनायक राऊतांची मोठी घोषणा

नुकतंच विनायक राऊतांनी आमदार दिपक केसरकर यांच्यासोबत चिपी विमानतळाची पाहणी केली आहे. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. चिपी विमानतळावरून गणेशचतुर्थीपूर्वी विमान प्रवास सुरु होणार आहे.

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाची वाहतूक सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त मिळाला आहे. येत्या गणेशचतुर्थी पूर्वी चिपी विमानतळावरुन विमान प्रवास सुरु होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

    नुकतंच विनायक राऊतांनी आमदार दिपक केसरकर यांच्यासोबत चिपी विमानतळाची पाहणी केली आहे. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. चिपी विमानतळावरून गणेशचतुर्थीपूर्वी विमान प्रवास सुरु होणार आहे.

    काही महिन्यांपूर्वी डीजीसीए आणि एअरपोर्ट अथॉरिटीने ज्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या, त्याचे तंतोतंत पालन करुन आता एअरपोर्ट वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. यासाठी जवळपास तीनशे ते साडेतीनशे कर्मचारी तसेच पंजाबवरुन मशिनरी आणि बाहेरून इतर टेक्नॉलजी मागवली होती. त्यांनी रनवेच्या पुर्नबांधणीचं काम व्यवस्थित केलं आहे. त्याचा रिपोर्ट आयआरबी कंपनीने डीजीसीएकडे पाठवला आहे, असे विनायक राऊत म्हणाले.