Union Home Minister Amit Shah accepted Narayan Rane's invitation to visit Sindhudurg

‘नारायण राणे यांच्यावर आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसे साभाळावे आणि सन्मान करावे, ते भाजपला माहिती आहे”, अश्या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची स्तुती केली आहे. या स्तुतीमुळे लवकरच राणे यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

    सिंधुदूर्ग :  ‘नारायण राणे यांच्यावर आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसे साभाळावे आणि सन्मान करावे, ते भाजपला माहिती आहे”, अश्या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची स्तुती केली आहे. या स्तुतीमुळे लवकरच राणे यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

    अमित शाह यांच्या हस्ते भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. सिंधुदुर्गातील हा कार्यक्रम राज्यात ऑपरेशन लोटसच्या चर्चा सुरू असताना राजकीय महत्वाचा होता.

    अमित शहा म्हणाले की, त्यांचे अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेन, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावले टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरती फिरती आहे.

    महाराष्ट्र वीरांची भुमी

    “सर्वात आधी मी या भूमीवर पाय ठेवून या मातीला स्पर्श करुन धन्य झालो. या भूमीकडून प्रचंड चेतना मिळते. कारण याच भूमीने संपूर्ण देशाला स्वदेशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी जीव देण्याचा संस्कार दिला आहे. जेव्हा मुघलांचे राज्य होते, औरंगजेबाचे राज्य होते, तेव्हा चहुबाजूने अंधार होता, कुठेही प्रकाशाची चिन्ह दिसत नव्हते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भाषा करत संपूर्ण देशाला चेतना दिली. तेव्हापासून सुरु झालेली ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सुरु आहे. आता मोदींच्या नेतृत्वात भारताला विश्वात नाव कमवायचे आहे. शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारचे साहस केले. त्यांनी हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. अनेक पराक्रम केले. आपल्या जीवाची बाजी लावून ते स्वधर्मासाठी लढले. भारतात सर्वात आधी नौसेना बनवण्याचं काम शिवाजी महाराजांनी याच पवित्र भूमीत केले”, असं अमित शाह म्हणाले.

    तीनही चाके तीन दिशेने

    यावेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात ऑटो रिक्षाची सरकार बनली, ज्याची तीनही चाके वेगवेगळ्या दिशेने चालत आहेत. एक पूर्व, दुसरा पश्चिम तर तिसरा वेगळ्या दिशेने चालतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेशाच्या विरोधात सत्तेच्या लालसेपोठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले. जनादेश हा मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देणारा होता”, असा दावा त्यांनी केला.

    शब्दाला पक्की माणसे

    शहा यांनी उध्दव ठाकरेंचा उल्लेख टाळून सांगितले की. “ते म्हणतात, आम्ही वचन मोडले आहे. मी तुम्हाला आठवण करुन देतो, आम्ही तर शब्दाचे पक्के माणसे. अशाप्रकारे खोटे आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांना वचन दिले त्यांनी जनादेशानुसार भाजपचा मुख्यमंत्री बसवा, असा आग्रह केला. पण आम्ही वचनाला पक्के होतो, आम्ही नितीश यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले”, असं अमित शाह म्हणाले.

    बाळासाहेबांचे सिद्धांत तापी नदीत

    “ते म्हणतात, एका बंद दराआड खोलीत चर्चा झालीय. मी वचन दिलेलं. मी कधीच खोलीत चर्चा करत नाही. जे आहे ते सर्व सार्वजनिक करतो. मी कधीच खोलीचे राजकारण केले नाही. मी तसे कुठलेच वचन दिले नाही”, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.“तुम्ही मोदीजींच्या नावाने प्रचार केला. आम्ही त्यांच्यादेखत प्रचार केला. त्यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे म्हणालो. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत टाकून ते सत्तेवर बसले आहेत”, असा घणाघात त्यांनी केला.