मंत्र्यांना झालेला कोरोना ‘कोविड १९’ की ‘राजकीय’? आमदार नितेश राणेंचा खोचक प्रश्न

सध्या वेगळ्या प्रकारचा सामना आम्हाला वाचायला मिळतो, बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वाचा गवगवा करणारा सामना आम्ही वाचला; पण आता उद्धव ठाकरेंचा नवीन सामना मार्केटमध्ये येतोय, इथे हिंदूंना विरोध केला जातो, हिंदूविरोधी सामना वाचायचा आम्ही बंद केला आहे अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.  

    सिंधुदुर्ग (Sindhudurg).  सध्या वेगळ्या प्रकारचा सामना आम्हाला वाचायला मिळतो, बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वाचा गवगवा करणारा सामना आम्ही वाचला; पण आता उद्धव ठाकरेंचा नवीन सामना मार्केटमध्ये येतोय, इथे हिंदूंना विरोध केला जातो, हिंदूविरोधी सामना वाचायचा आम्ही बंद केला आहे अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

    ‘कोविड १९’ की राजकीय?
    एक तारखेला अधिवेशन आहे आणि गेल्या आठ दिवसांत मंत्र्यांना कोरोना होण्याच्या बातम्या येताहेत, मंत्र्यांना झालेला हा कोरोना कोविड १९ चा आहे की राजकीय? असा खोचक सवालही नितेश राणें  यांनी केला आहे. ते म्हणाले की, अधिवेशनात भाजपच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही, म्हणून कोरोनाचा आसरा हे राज्य सरकार घेत नाही ना? असा प्रश्न पडला आहे, त्यामुळे डब्लूएचओला पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी मी सांगणार आहे, अशी टाकही आमदार नितेश राणे यांनी केली आहे.