मृतक मंदार चंद्रशेखर चव्हाण, मालवण
मृतक मंदार चंद्रशेखर चव्हाण, मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील वायरी मारुती मंदिर नजीक राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. मंदार चंद्रशेखर चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून घटना रविवारी सकाळी साडे सहा वाजता ही घटना समोर आली.

मालवण (Malwan).  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील वायरी मारुती मंदिर नजीक राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. मंदार चंद्रशेखर चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून घटना रविवारी सकाळी साडे सहा वाजता ही घटना समोर आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. मंदार हा आपल्या भावांसोबत राहत होता. त्याचे आई, वडील मुंबई येथे वास्तव्यास आहेत. दरम्यान, आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.