सोलापूर ग्रामीण मंगलकार्यालयांना १ लाख ३० हजारांचा दंड ; कोरोना विषाणू प्रादर्भावाचे उल्लंघन

कोरोना प्रादर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेनी कडक धोरण हाती घेतले आहे. गर्दीच्या ठिकाणी करडी नजर ठेवण्यात आली आहे. जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहे. जि.प. मुख्यालयात विनामास्क फिरणाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे

  सोलापूर :  ग्रामीण भागातील मंगलकार्यालय , दुकानदार, विनामास्क मोकट फिरणाऱ्यांवर १ लाख ३० हजार ६०० रुपयांची दंडात्मक कारवाई जिल्हा परिषदेनी केली आहे.अकलकोट २१ हजार ३००, बार्शी १ हजार,करमाळा ५ हजार २००,माळशिरस २ हजार ६००, मंगळवेढा ४ हजार ९००,मोहोळ ५ हजार २००,पंढरपूर ८० हजार ९००,सांगोला ६ हजार ४००, उत्तर सोलापूर ५००,दक्षिण सोलापूर २हजार ६०० आशी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ५० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १७ मंगलकार्यालयावर १ हजार ते ५ हजार पर्यंतची कारवाई करण्यात आली आहे.

  जि.प.मूख्यालयात प्रवेश करतेवेळी कोरोना तपासणी करताना जि.प.आरोग्य पथक

  कोरोना प्रादर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेनी कडक धोरण हाती घेतले आहे. गर्दीच्या ठिकाणी करडी नजर ठेवण्यात आली आहे. जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहे.

  जि.प. मुख्यालयात विनामास्क फिरणाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कामकाज जलद होण्यासाठी ऑनलाईन कामकाजाची सोय करण्यात आली आहे. मुख्यालयात प्रवेश करतेवेळी कोरोना तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.

  लोक बऱ्यापैकी पालन करीत आहेत. अधिकारी कर्मचारी यांचे दौरे वाढले आहेत. जनजागृती मोठ्या प्रमाणात सुरू आहे , आणखी कार्यवाही गती वाढवण्यासाठी सुचना देत आहे. ग्रामसेवक यांनी रोज गाव चा आढावा घ्यावा , मंगल कार्यालयात भेटी द्यावीत. रुग्ण निघालेल्या गावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून तात्काळ त्या लोकांची टेस्टिंग २४ तास चे आत करावी. दूधवाला ,भाजीपाला वाले , इत्यादी ची टेस्टिंग बंधनकारक करावी त्या शिवाय त्यांना फिरू देऊ नये, आशी संयुक्त जबाबदारी ग्रामसेवक , सरपंचावर सोपविण्यात आली आहे.

  दिलीप स्वामी, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.