सोलापूरात १० दिवसाचा लॉकडाऊन,  जिल्हाधिकाऱ्यांसह २ अधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

  • सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी १६ जुलै ते २६ जुलै असा ३ महिन्यांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे याविरोधात शुंभुराजे युवा संघटनेचे प्रमुख नितीन चव्हाण यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीसाठी मंगळवार २१ जुलैला जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, तसेच पालिका आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोलापूर – सोलापूरात कोरोनाला आळा घालण्यासाठी १० दिवसाचा कडक लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे लॉकडाऊन विरोधात याचिका दाखल केल्याने, कलेक्टर जिल्हाधिकारी, आणि पोलीस आयुक्त यांनी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात कोरोना रोखण्यासाठी सर्वच जिल्ह्यातंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे आधिच ३ महिने लॉकडाऊन झाला असल्यामुळे सर्व सामान्यांना आर्थिक लढाईला सामोरे जावे लागत आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचा का दिला आदेश

सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी १६ जुलै ते २६ जुलै असा ३ महिन्यांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे याविरोधात शुंभुराजे युवा संघटनेचे प्रमुख नितीन चव्हाण यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीसाठी मंगळवार २१ जुलैला जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, तसेच पालिका आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन करतना सोलापूरातील चीफ मेडीकल ऑफिसरची परवानगी घेतली नाही. तसेच अधिच तीन महिना लॉकडाऊन होता. त्यामुळे नागरिकांना रोजगार नव्हता. यामुळे परवानगी घेतली नसल्यामुळे ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणावर न्यायाधीश काय सुनावणी देतात याकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागले आहे.