जिल्हयात दहा हजार शौषखड्डेंना प्रारंभ : दिलीप स्वामी 

  सोलापूर : कोरोना गेला नाही. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची काळजी घ्या. १० हजार शौषखड्डे अभियानास जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

  सोरेगाव व मंद्रुप येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात ते बोलत होते.

  सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते. या निबंध स्पर्धा सुरू असताना प्रत्यक्ष पाहणी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली.

  शाळा व गाव भेट

  सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्सकारी दिलीप स्वामी यांनी उत्तर सोलापूर पंचायत समिती अंतर्गत सोरेगाव येथील स्वच्छ व सुंदर शाळेस भेट दिली. त्यानंतर सोरेगाव व मंद्रुप येथील लोकसेवा विद्यालयात सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी च्या

  निबंध स्पर्धेत पाहणी केली. मंद्रुप येथील केंद्र अंतर्गत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.

  इंदिरा नगर येथील स्वच्छ व सुंदर असलेल्या प्राथमिक शाळेस भेट दिली. अस्थिव्यग असलेले यशवंत कांबळे या मुख्याध्यपकांनी परिश्रम करून शाळेचे रूपडे पालटले आहे. या शाळेची पाहणी केली. मुख्याध्यापक कांबळे यांचा जागेवर जाऊन सिईओ स्वामी यांनी सत्कार केला.

  या वेळा दक्षिण सोलापूरच्या

  पालक अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील, गटविकास अधिकारी राहुल देसाई, उत्तर सोलापूर चे गटविकास अधिकारी डाॅ. प्रशांत देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, गटशिक्षणाधिकारी बनसोडे, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, मुख्याध्यापक रणजित गरड, केंद्रप्रमुख सिद्धाराम वाघमोडे, शिक्षण विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, गटशिक्षणाधिकारी बापू जमादार, मंद्रुप चा सरपंच कलावती खंदारे , मुख्याध्यापक टेळे प्रमुख उपस्थित होते.

  जिल्हात दहा हजार शौषखड्डेंना प्रारंभ

  महात्मा गांधी जयंतीनिमित्त मंद्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित स्थायित्व व सुजलाम अभियान व स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षण २०२१ चा गाव स्तरावरील शुभारंभ सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला. या प्रसंगी सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डेचा शुभारंभ करण्यात आला.