जि.प.सदस्यांना १०० कोटींचा निधी वितरण ; समाजकल्याण ,कृषी,ग्रामपंचायत विभागाचा निधी

सीईओ दिलीप स्वामी यांच्या मान्यतेने होणार वाटप

  शेखर गोतसुर्वे ,सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद सदस्यांना मार्च अखेर पर्यंत १०० कोटी पर्यंतचा निधी दिला जाणार आहे.समाजकल्याण, ग्रामपंचायत, कृषी विभागातील योजनेचा या निधीत समावेश असणार आहे.जि.प.सदस्यानी सुचीत केलेल्या कामांची यादी अंतिम टप्यात आली आहे. सीईओ दिलीप स्वामी यांच्या मान्यतेने निधी वाटप होणार आहे. समाजकल्याण विभागातील दलितवस्ती सुधारसाठी ५५ कोटी , ग्रामपंचायातच्या १५ वित्त आयोगातून १३ कोटी ८४ लाख, जनसुविधा १६ कोटी,नागरी सुविधा ७ कोटी , कृषी विभागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजना असा तालूकानिहाय निधी सदस्यानी सुचीत शिफारस केलेल्या स्थानिक ग्रामपंचायतीना मिळणार आहे. यातील कृषी विभागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजनेतील लाभार्थी निवडी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी देण्यात येणार आहे. हा निधी सन २०२०-२१सालातील देण्यात येणार आहे. वर्षभरातील प्रशासकीय बैठका,कार्यक्रम,प्रवासभत्ता, पदाधिकारी मानधन,इंधन आदी बाबींसाठी १ कोटी पर्यंत खर्च करण्यात येणार आहे.

  जिल्हा परिषदेच्या स्वउत्पनातील अर्थसंकल्प २५ मार्च रोजी सभागृहात मांडण्यात येणार आहे. मुळ अंदाजपञकात ४० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. ५०% सेस निधी कपातीचे धोरण कायम राहील्याने सदस्यांना सेसफंडातून २० कोटींचा निधी मिळणार आहे. या २० कोटी पैकी ५ कोटी निधी विविध कार्यक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

  समाजकल्याण ७ कोटी , महिला बालकल्याण ६ कोटी, कॄषी पशूसंर्वधन ८ कोटी,बांधकाम १० कोटी,आशी विविध समिती सभापतीनी मागणी केली आहे. या मागणीपैकी कोणत्या समितीला किती निधी मिळणार याची उत्सुकता लागून राहीली आहे.

  पंधराव्या वित्त आयोग,जनसुविधा, नागरि सुविधाच्या सदस्यांनी सुचित केलेल्या कामानुसार अंतिम यादया करण्यात आल्या आहेत. सीईओंच्या मान्यतेनी मार्च अखेर पर्यंत निधी वाटप होणार आहे.

  चंचल पाटील,डेप्यूटी सीईओ ग्रामपंचायत जि.प

  -यादया अंतिम टप्यात

  संतोष जाधव ,जिल्हा समाजकल्याणधिकारी जि.प.

  “दलितवस्ती सुधार योजनेतील सदस्यांनी सुचीत केलेल्या कामांची यादी अंतिम टप्यात आली आहे. येत्या १० ते १५ दिवसात वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे.”
  -संतोष जाधव ( जिल्हा समाजकल्याणधिकारी जि.प. )