मोहोळमध्ये रक्तदान शिबिरात १०१ जणांचा सहभाग

    मोहोळ : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोहोळ येथील राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.

    शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध सामाजिक आणि अभिनव उपक्रम राबवणाऱ्या राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मोहोळ शहरातील शहाजीराव पाटील सभागृहात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून आदर्शवत आणि प्रेरणादायी पद्धतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

    यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर, कौशिक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, उपनगराध्यक्ष प्रमोद बापु डोके, नितीन गुंड, मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण डोके, अण्णासाहेब बचुटे, नागेश भोसले, सोमनाथ राऊत, महेश माने, अजित भोसले, पोपट डोके, योगेश थोरात, रोहित डोके, विक्रांत मांडवे, दिलीप कोकणे, सागर मोळे, विक्रांत डोके, बापूसाहेब मांडवे, योगेश डोके, प्रदीप घोडके, गणेश बोडके, मुकेश बचूटे, अतुल घाटगे, वैभव मांडवे, ओंकार काकडे, प्रवीण नागटिळक, सुहास डोके, यांच्यासह राजमुद्रा युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.

    १०१ जणांचे रक्तदान

    यंदाच्या रक्तदान शिबिरात कोरोनाच्या महामारीत काहींना कोरोनाची लागण झाली तर काहींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस नुकतेच घेतल्याने अनेकांना इच्छा असूनही रक्तदान करता आले नाही. अशा परिस्थतीतही राजमुद्रा परिवाराच्या सर्व सदस्यांच्या प्रयत्नामुळे १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. राजमुद्रा परिवारातील सर्व सदस्यांचे नेहमीच सहकार्य लाभते, असे माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके यांनी सांगितले.